loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिनाथ सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार शरद पवार यांचे 'आदिनाथ बचाव' समितीला अश्वासन !

आदिनाथ बचाव समितीचे शिष्टमंडळ बुधवार व गुरुवारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी व इतर बँकांचे अधिकारी यांना भेटून आले देशाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदार शरदचंद्रजी पवार यांची ही बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन सहकार तत्वावर कारखाना चालत असेल तर सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मध्यंतरी आदिनाथ बचाव च्या शिष्टमंडळाने रश्मी बागल व आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगर यांची भेट घेतली होती यावेळी कारखान्याची सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासन रश्मी बागल यांनी शिष्टमंडळाला दिले होते मात्र अद्याप त्यांनी सर्वसाधारण सभेचा अजेंडा देखील काढलेला नाही यामुळे यापुढे आता आदिनाथ च्या सभासदांनाच करो या मरो ची लढाई करावी लागेल असे देखील बचाव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आता पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी 13 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे महादेव मंदिरा शेजारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व तमाम ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी यांनी या बैठकीस उपस्थित रहावे तसेच राजकीय जोडे बाजुला ठेवुन सर्वांनी एकत्र यावे .असे आवाहन करण्यात आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कारखानास्थळावर उद्या होणाऱ्या बैठकीत आदिनाथ बचाव समिती मोठा निर्णय घेणार असल्याच्या देखील चर्चा असून या बैठकीस मोठ्या संख्येत सभासद उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts