loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा पंचायत समिती सभापती सदस्यांचा कार्यकाळ संपला -प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

सोलापुर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या १३ मार्चला; तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या २० मार्चला संपुष्टात येत आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांवर १३ मार्चपासून; तर जिल्हा परिषदेवर २० मार्चपासून प्रशासक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा पंचायत समीती च्या सदस्यांची पहिली बैठक १३मार्च २०१७ रोजी झाली होती उद्या या सर्व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल समाप्त होत आहे.करमाळा पंचायत समीतचे सभापती म्हणुन शेखर गाडे यांनी अडीच वर्षे ,गहिनीनाथ ननवरे यांनी बावीस महिने तर पै अतूल पाटील यांनी आठ महिन्यांपासून पदभार संभाळला आहे तर उपसभापती म्हणुन पै दत्ता सरडे,गहिनीनाथ ननवरे केशरबाई चौधरी यांनी कामकाज पाहिले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

उद्यापासून प्रशासन येणार असल्याने विद्यमान सभापती अतुल पाटील ,उपसभापती केशरबाई चौधरी यांच्यासह सर्व सदस्य हे आत्ता माजी पदाधिकारी होणार आहेत. करमाळा नगरपालिकेवर देखील सध्या प्रशासक आहे.त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकाच्या दैनंदिन कामासाठी महत्वाच्या अशा दोन्ही कार्यालयावर प्रशासक असल्याने तालुक्यातील नागरींकाचे आतापासुनच निवडणूकांकडे लक्ष लागले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पंचायत समितीतीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी हेच कार्यभार पाहणार असल्याने गटविकास अधिकारी मनोज राऊत हेच प्रशासक असणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांमुळे राज्यातील पंचायत समीती ,नगरपालीका ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.प्रशासकांचा कालावधी हा सहा महिन्यापर्यंत असतो .त्यामुळेच निवडणूक कधी होणार की प्रशासक सहामहिन्यांचा कालावधी पुर्ण करतात हे पहावे लागणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts