loader
Breaking News
Breaking News
Foto

आगोदर वीजबिल दुरुस्ती मगच वसुलीचा तगादा लावा- काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांची मागणी

आगोदर वीजबिल दुरूस्ती करा मगच शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करा अशी महत्त्वपूर्ण मागणी काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी महावितरण चे अभियंता जाधव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काँग्रेसच्या या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यतील शेतकऱ्यांना वाढीव H.P. ची बिले देण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. न.3 H.P. वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 H.P. ची बिल देण्यात आली आहेत.जे शेतकरी 5 H.P. वापरतात त्यांना 7.5 H.P.ची बिले तर जे शेतकरी 7.5 H.P.वापरतात त्यांना 10 H.P. ची बिले देण्यात आली आहेत.यातुन वापर न झालेल्या H.P, ची बिले विनाकारण शेतकऱ्यांवर लादण्यात आल्याने बिलाचा आकडा फुगला असून एकरकमी परतफेडीचा लाभ खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे महावितरण ने शेतकऱ्यांकडून दुरुस्ती साठी अर्ज घेऊन वीजबिल कमी करून द्यावे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोनाच्या संकटातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांकडून टप्पे पाडून वसुली करावी सध्या शेतकऱ्यांचा उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर आहे.अनेक कारखान्याकडुन पहिला हप्ता आलेला नाही त्यामुळे शेतकरी आगोदरच अडचणीत असुन महावितरणने सामंजस्याने भुमिका घेऊन वसुली करावी असे देखील नमूद करण्यात आले आहे.या वेळी सरचिटणीस संभाजी शिंदे तालुका उपाध्यक्ष- अशोक घरबुडे,दादासाहेब पवार,प्रताप खाडे अमोल पवार,सुजय जगताप,नितीन चोपडे,योगेश राखुंडे,बापू खाडे,शेषराव केकान, आदी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी यातुन संपुर्ण तालुक्यातील गावागावात चुकीचे बिल दुरुस्त करुन देण्यासाठी अभियान राबवुन शेतकऱ्यांना न्याय देऊ असे ठोस आश्वासन दिले.व विनाकारण अन्याय होवु देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts