loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा शहरात पाटील गटाकडे निर्णायक मते असुन शहरविकासास प्राधान्य देऊन योग्य वेळी भुमिका मांडणार-नारायण पाटील गटाची भुमिका

करमाळा शहरात पाटील गटाकडे निर्णायक मते असुन शहरविकासास प्राधान्य देऊन योग्य वेळी भुमिका मांडणार असल्याचे सुचक वक्तव्य माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील गटाचे कोणते नियोजन असणार आहे या प्रश्नावर चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले की माजी आमदार नारायण पाटील यांचे नेतृत्व मानणारे सुजाण नागरिक करमाळा शहरात असुन मागील विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी विकासाला प्राधान्य देत मा आ नारायण पाटील यांना खंबीर साथ दिली.आता आगामी काळात शहराच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेऊन मतदारांच्या सुचना व आग्रहास प्राधान्य देण्यात येणार आहे. सन 2014 ते 2019 च्या कालावधीत करमाळा शहराच्या विकासासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी निधी प्राप्त करून दिला. करमाळा शहराला जोडणाऱ्या जवळपास 30 आसपासच्या गावांना दळणवळणाची सोय करुन देण्यासाठी शहरातील एस टी बसस्थानकाचे नुतनीकरण माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. या बसस्थानकाच्या अद्यावतीकरणामुळे याचा चांगला फायदा करमाळा शहरातील छोटे व्यावसायिक, फळ विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठेस झाला. माजी आमदार नारायण पाटील यांच्या कालावधीत शहरातील व्यापारी बांधवासाठी नेहमीच अनूकूल वातावरण निर्माण करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राजकीय जोडे बाजूला सारुन करमाळा शहरातील मुलभुत सुविधांसाठी काही प्रमाणात का होईना पण नगरविकास खात्याच्या मार्फत विशेष निधी मिळवून दिला. माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा शहर तसेच तालूक्याची आराध्यदेवता असलेल्या श्री कमलादेवीच्या मंदिरास कोट्यावधी रुपये तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मिळवून दिले. यातुन भाविकांसाठी मंदिर व परिसरात मुलभूत सुविधा तसेच तीर्थ क्षेत्र सुशोभिकरण करण्यात आले. महावितरणच्या करमाळा शहर व ग्रामिण विभागातील वीज उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश आले. यामुळेच शहरवासीयांना अतिरिक्त भारनियमाचा त्रास सहन करावा लागला नाही.करमाळा शहराच्या आरोग्य सुविधेस बळकटी देण्यासाठी येथे कार्यान्वित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासाठी खाटांची संख्या वाढ, आरोग्य सुविधा निर्माण करणे, डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या निवासी इमारतीच्या बांधकामासाठी निधी मिळवून देणे यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन प्रत्यक्षात या कामांना गती दिली. करमाळा शहरात आपली सत्ता असो वा नसो याचा फारसा विचार न करता करमाळा शहर हे तालूक्याच्या राजधानीचे ठिकाण असल्याने माजी आमदार नारायण पाटील यांनी सतत या शहराच्या विकासासाठी सकारात्मक धोरण कायम ठेवले. यामुळे मग या शहरात खास करुन माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मतदार हा आगामीकाळात नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा शहराच्या विकासासाठी माजी आमदार नारायण पाटील हेच पाटील गटाची भूमिका व निर्णय घेणार असून नागरिक व व्यापारी यांचेशी थेट संवाद साधनार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी स्पष्ट केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts