करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून १५० बेड क्षमतेचे कोवीड केअर सेंटरची उभारणी केली. कोरोनाच्या रूग्णांची वाढ जर झाली तर रूग्णांची गैरसोय होऊ नये याचा विचार करून नगराध्यक्ष वेैभवराजे जगताप तसेच मुख्याधिकारी वीणा पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. हे कोवीड सेंटर करमाळा नगरपरिषदेच्या अखत्यारीतील नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथे उभारले असून येथे बाथरुम, पाणी, लाईट,शौचालय, फॅन,जाळीयुक्त खिडक्या , गरम पाण्याची सोय, योगा व व्यायामाकरीता स्टेज या अनुषंगिक गोष्टींची उपलब्धता करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याचबरोबर याच शाळेत प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांकरिता तपासणीकरिता फिव्हर सेंटर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच याच शाळेत कोरोना चाचणीकरिता रुग्णांचे स्वॅब सॅम्पल घेणे, रॅपिड अँन्टीजन टेस्ट घेणे याकरिता तपासणी केंद्राकरीता आवश्यक सुविधा, फॅन,निर्जंतुकीकरण व इतर साहित्य नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिले आहे.
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई,मा.आमदार संजयमामा शिंदे,जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी करमाळा नगरपरिषदेचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्व कामांचा आढावा घेत असताना उत्कृष्ठ काम केल्याबद्दल कौतुक केले होते. याच बैठकीत मा.नगराध्यक्ष वेैभवराजे जगताप यांनी करमाळा नगरपरिषदेच्या शाळेत कोवीड केअर सेंटर उभारण्याची तयार दर्शविली होती. त्यानुसार , सदर कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते करण्यात आले व इमारतीचा ताबा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घोगरे यांच्याकडे देण्यात आला. सदर कोवीड केअर सेंटर उभारणेकामी मा.प्रांतधिकारी ज्योती कदम व मा.तहसिलदार समीर माने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला.
करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून कोवीड केअर सेंटर उभारले जाणे ही खरोखर खूप अभिमानाची व गौरवास्पद गोष्ट आहे याकरिता मी सर्व सन्माननीय नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक यांचे कौतुक करते -वीणा पवार, मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद
सदर कोवीड केअर सेंटर उभारणीकामी करमाळा नगरपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्य यांच्याकडून मा. सर्वसाधारण सभेत मान्यता देण्याकरिता ठराव संमत केला जाणार आहे. कोवीड केअर सेंटर उभारणीसाठी तसेच शहर अभियंता समेशर पठाण,पाणीपुरवठा विभागाचे कमलाकर भोज, विद्युत विभागाचे बाळनाथ क्षिरसागर व सर्व कर्मचारीवृंद यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर कोवीड केअर सेंटर उभारल्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येकडे बघता निश्चित योग्य सोय होणार आहे. सदर उद्घाटन प्रसंगी करमाळा तालुक्याचे तहसिलदार समीर माने,पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी घोगरे, वैद्यकीय अधिकारी अमोल डुकरे, बांधकाम उपअभियंता अमित निमकर यांच्या उपस्थितीबरोबरच सर्व करमाळा नगरपरिषद ,कुटीर रुग्णालय,तहसील विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांचा कोरोनासांकटात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.