loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व नामदेवराव जगताप यांचा पुतळा असलेल्या परिसरात रात्रीची गस्त वाढवा. करमाळा काँग्रेस ची मागणी

स्व नामदेवराव जगताप यांचा पुतळा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त व पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीसांकडे केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत ६ मार्च रोजी करमाळा शहरात काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम असुन तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असुन नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेऊन शहरात डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर काँग्रेस च्या अनेक दिवंगत नेते व राष्ट्रीय अध्यक्षांचे फोटो आहेत मात्र काही समाजकंटकानी या बॅनरची मोडतोड करून विटंबना झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

ज्या परिसरातील फलकांची विटंबना झाली आहे त्याच परिसरात स्व नामदेवराव जगताप यांचा पुतळा असुन पुतळ्याचीही समाजकंटकाकडुन विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी आपल्या विभागाकडुन सदर भागामध्ये रात्रीचा पोलिस बंदोबस्त व गस्त वाढवावी किंवा आमच्या कार्यकर्त्यांना गस्त घालण्याची परवानगी द्यावी.असे या निवेदनात म्हटले असुन असे कृत्य करणारे समाजकंटक व आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होवुन अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कोणावर.? असा सवाल उपस्थित केला आहे.यावेळी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदनाच्या प्रती.मुख्यमंत्री .उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts