loader
Breaking News
Breaking News
Foto

नागरिकांनी 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमाचा लाभ घ्यावा - नायब तहसीलदार सुभाष बदे

आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी या आ. संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाची सुरुवात 26 नोव्हेंबर 2021 पासून करमाळा तालुक्यात झालेली असून आज कोर्टी येथे या शिबिराचे उद्घाटन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत ,नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बी. एन. गायकवाड, बागवान साहेब, गावचे सरपंच निलेश कुटे, सुभाष अभंग, निळकंठ अभंग, सुजित बागल आदी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच निलेश कुटे यांनी केले प्रास्ताविकामधून त्यांनी या शिबिरामध्ये ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्या योजनांची माहिती व निकष सांगितले. अध्यक्षीय भाषण करताना नायब तहसीलदार सुभाष बदे म्हणाले की ,आमदार संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आमदार आपल्या दारी व महाराष्ट्र शासनाचा महाराजस्व अभियान या अंतर्गत तालुक्यामध्ये आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.यामधून पोटखराब जमीन , आधार कार्ड दुरुस्ती ,सातबारा उतारे ,उत्पन्नाचे दाखले ,रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे आदी कामे तात्काळ केली जातात. तसेच ज्या कामांना 3-4 दिवसाचा अवधी लागतो असे प्रस्ताव जमा करून 8 दिवसाच्या आत संबंधित काम पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आमदार आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी बोलताना सुजित बागल म्हणाले की या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद असून रावगाव येथे 1499, चिखलठाण येथे 3131,जातेगाव येथे 1930 असे मिळून 6560 नागरींकाना या योजनेचा लाभ झाला आहे त्यामुळे जनतेतून आमदार संजय मामा शिंदे यांचे आभार व्यक्त होत आहेत असे सांगीतले.तसेच विनाकारण या सामाजिक उपक्रमाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. या उपक्रमाचे नाव आमदार आपल्या दारी असो किंवा महाराजस्व अभियान असो नाव कोणतेही असले तरी या उपक्रमाची संकल्पना, नियोजन , खर्च, योजनेचा प्रसार हे सर्व काम आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयातून केले जात आहे. त्यामुळे या सामाजिक कार्याला शुभेच्छा देण्याऐवजी काही लोक त्यामध्ये मिठाचे खडे टाकत आहेत. हे उद्योग त्यांनी बंद करावेत असे मत व्यक्त केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उपस्थितांचे आभार आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीन नवले यांनी केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts