loader
Breaking News
Breaking News
Foto

मी नारायण पाटील गटाचाच कार्यकर्ता- धुळाभाऊ कोकरे यांचा खुलासा

मी माजी आमदार नारायण पाटील गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून आजपर्यंत कधीच गट सोडण्याचा विचार केलेला नाही व भविष्यात देखील तसा विचार नसून काल झालेला कार्यक्रम हा राजकीय नसून कौटुंबिक होता त्यामुळे मी संजयमामा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त निराधार असल्याचा खुलासा आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अधिक बोलताना कोकरे म्हणाले की आदिनाथ चे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक अशा विविध पदांवर काम करण्याची मला संधी नेतृत्वाने दिली आहे. नारायण पाटील व माझ्यामध्ये दररोज संवाद होत असून गट सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसून आगामी निवडणुकीत पाटील गटाबरोबरच काम करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

काल धुळाभाऊ कोकरे यांचे उंदरगाव येथील बंधु जालिंदर कोकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला यावेळी आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती .धुळाभाऊ कोकरे यांचा वाढदिवस असल्याने जगताप व शिंदे यांनी कोकरे यांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमास आमदार शिंदे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती व मागील आठवड्यातील राजकीय घडामोडींवरून करमाळा चौफेर ने "निमित्त वाढदिवसाचे, चर्चा प्रवेशाची ,धुळाभाऊ कोकरे आमदार शिंदे गटाच्या वाटेवर.?" असे शिर्षक देऊन कोकरे यांच्या प्रवेशाची शक्यता असल्याचे वृत्त दिल्यानंतर पाटील गटाने हि बातमी गांभीर्यायाने घेतली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अखेर धुळाभाऊ कोकरे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्याने काल पासुन सुरु असलेल्या चर्चांना आत्ता पूर्णविराम मिळाला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts