loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटील गटाचा दावा खरा निघाला, "आमदार आपल्या दारी"हा शासकीय उपक्रम नव्हताच

माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या "आमदार आपल्या दारी " या उपक्रमाला आवाहन देत मुळात असा कुठलाच उपक्रम शासनाकडून राबवण्यात येत नसुन हा " राजस्व अभियान " हाच उपक्रम आहे. आमदार संजयमामा शिंदे हे या उपक्रमाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला होता. यावर प्रसिद्धीमाध्यमांवर तसेच सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. शिंदे गटाकडून प्रवक्ते तळेकर यांच्यावर टिकेची झोड उठवली गेली होती. परंतू आज मात्र पाटील गटाचा दावा खरा ठरला असल्याचे तहसीलदार समीर माने यांच्या अधिकृत पत्रावरुन दिसुन आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दिनांक ७ मार्च रोजी साडे ता. करमाळा येथे महाराजस्व अभियान होणार असून याबाबची सुचना एका पत्राद्वारे तहसीलदार यांनी संबंधितांना दिली आहे. या पत्राचा विषयच आमदार शिंदे गटाचे बिंग फोडणारा आहे. पत्रातील विषयात महाराजस्व अभियान २०२१ शिबीर आयोजित करण्याबाबत असा असुन यास आमदार संजयमामा शिंदे यांच्या दि १९/११/२०२१ रोजीच्या पत्राचा (जावक क्रमांक ५०६/२०२१) संदर्भ दिला आहे. या पत्राच्या प्रति कोणास पाठवायच्या याची यादी पत्राच्या सुरुवातीस दिली असून यानुसार क्रमांक १३ मध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनाही या अभियानाची कल्पना देऊन निमंत्रित करण्यात आले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यापूर्वीच्या अभियानाच्या ठिकाणी पं स तसेच जि प सदस्य यांना बोलावले गेले नव्हते व हे अभियान "आमदार आपल्या दारी " या नावाने चालवून शासकीय उपक्रमाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतू आज प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होऊन हे अभियान तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली होणार असल्याने सर्वांनाच यात सहभागी होता येणार आहे.दि ७ मार्च रोजी साडे येथे हे महाराजस्व अभियान होणार असून यात साडे, घोटी, आळसुंदे, सालसे, आवाटी, नेरले, वरकुटे, पाथुर्डी, सौंदे व शेलगाव (क) या गावांचा समावेश आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

याबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्याची सवय असुन उद्या जर रशीयाने युध्दात युक्रेनवर विजय मिळविला तर आमदार संजयमामा शिंदे हे हा विजय माझ्यामुळेच मिळाला असे सांगून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील असा मार्मिक टोला तळेकर यांनी लगावला. तसेच करमाळा पंचायत समिती वर शिवसेनेची सत्ता असून जिल्हा परिषदेचे सदस्य सुध्दा सेनेचे आहेत. यामुळे आता माननीय तहसीलदार साहेब यांनी राजशिष्टाचार म्हणून जिप अध्यक्ष व सभापती यांना तसेच संबंधित गणाचे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनाही या अभियानाच्मा उद्घाटन प्रसंगी बोलवावे. शेवटी जनतेने निवडून दिलेले हे प्रतिनिधी आहेत व त्यांचीही बांधिलकी या शासनाच्या चांगल्या उपक्रमाशी निश्चितच असणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts