loader
Breaking News
Breaking News
Foto

कोर्टी येथे उद्या आमदार आपल्या दारी उपक्रम. योजने संबंधित कागदपते घेऊन उपस्थित राहण्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचे आवाहन

करमाळा तालुक्यात"आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!"हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमा द्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येतील. तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण होवुन शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तहसील कचेरी, सरकारी दवाखाने, पंचायत समितीती ,गॅस एजन्सी, सेतु कार्यालयात अनेक वेळेस हेलपाटे मारुन वेळप्रसंगी चिरिमिरी देऊन देखील नागरींकाची कामे वेळेत होत नव्हती .अनेक जण अशिक्षित पणा मुळे व कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने शासकीय लाभापासून वंचित राहत होती. मात्र आमदार संजय मामा शिंदे समर्थक सुजित तात्या बागल यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली व आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढाकार घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःच्या गावात या योजना मिळत असल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उद्या कोर्टी येथे होणाऱ्या या उपक्रमास नागरिकांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे.असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे.शुक्रवार ,दिनांक 04 /03/ 2022कोर्टी येथे हा उपक्रम होणार असून - कोर्टी, कुस्करवाडी, कुंभारगाव, सावडी, गोरेवाडी , कूस्करवाडी, पोंधवडी, राजुरी , दिवेगव्हाण, हुलगेवाडी, देलवडी ,भिलारवाडी, कावळवाडी.हि सहभागी गावे आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts