माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक आदिनाथ चे माजी संचालक व लोकनेते नारायण (आबा) पाटील पतसंस्थेचे चेअरमन धुळाभाऊ कोकरे यांचा काल वाढदिवस संपन्न झाला. परंतु वाढदिवसानिमित्त दरवर्षी नारायण पाटील यांच्या हस्ते पतसंस्थेत होणारा सत्कार न होता या वर्षी उंदरगाव येथील कोकरे यांचे बंधु जालिंदर कोकरे यांच्या फार्महाऊसवर झाला व विशेष म्हणजे हा सत्कार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते झाला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आमदार शिंदे यांच्या समर्थक चिखलठाण चे सरपंच चंद्रकांत सरडे,तानाजी झोळ, यांची देखील यावेळी उपस्थिती होती त्यामुळे "निमित्त वाढदिवसाचे मात्र नियोजन प्रवेशाचे "अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.कोकरे कुटुंबीय हे पश्चिम भागातील प्रगतशील, प्रयोगशील व कुटुंब म्हणून ओळखले जाते.तसेच शैक्षणिक दृष्ट्या देखील हे कुटुंब प्रगल्भ आहे. 'सदन कुटुंब 'म्हणून या परिवाराची ओळख आसली तरी या परिवारातील धुळाभाऊ कोकरे सोडले तर राजकारणात दुसरे नाव चर्चेत नाही व या परिवारातील अन्य कोणी फार मोठी राजकीय म्हत्वकांक्षा बाळगुन देखील नाही.मात्र असे आसले तरी कोकरे यांचे बंधु जालिंदर कोकरे यांची कन्या ही आमदार संजयमामा शिंदे समर्थक डाॅक्टर राहुल कोळेकर यांच्या पत्नी असल्याने या परिवाराची आमदार शिंदे यांच्यासोबत जवळीक वाढली आहे.
सर्वच नेते वाढदिवसानिमित्त एकमेकांचा सत्कार करत असतात माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देखील दिग्विजय बागल, विलासराव घुमरे यांच्यासह अनेक गटाचे नेते येतात तसेच इतर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील देखील उपस्थित असतात केवळ वाढदिवसानिमित्तचे सत्कार व घरगुती कार्यक्रमावरून गटप्रवेशाची चर्चा करणे घाईचे असले तरी दोन दिवसातील घडामोडींत पहाता कोकरे वेगळ्या पावित्र्यात तर नाहीत ना अशी शंका घेण्यास वाव मिळत आहे. सध्या आदिनाथ बचाव समितीकडून अनेक बैठका सुरु आहेत सर्वात पहिल्यांदा शिंदे समर्थक नेते आदिनाथ बचाव साठी आघाडीवर होते , सभासदांना उपस्थित राह्याचे आवाहन करून शिंदे समर्थकच या बैठकीस फिरकले नसल्याने चर्चेचा विषय बनला होता मात्र या बैठकीत धुळाभाऊ कोकरे उपस्थित होते .त्यानंतर आदिनाथ मंदिर येथे झालेल्या बैठकीत उपस्थित राहुन दहा लाख रु ठेव देणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले होते मात्र काल आदिनाथ कारखाना येथे बचाव समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत कोकरे यांनी दांडी मारली तसेच रश्मी बागल यांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात देखील धुळाभाऊ कोकरे अनुपस्थित होते. त्यामुळे पाटील यांचे समर्थक म्हणून दोन बैठकीस उपस्थित असलेले धुळाभाऊ कोकरे हे दोन महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार शिंदे समर्थक अनुपस्थित होते का? अशी चर्चा सुरु आहे. तसेच परवा वीज प्रश्नावर तहसील कार्यालयासमोर माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास कोकरे यांची उपस्थिती हजेरी लावण्यापुरतीच होती.पाटील यांच्याबरोबर तहसीलदार व महावितरण च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेच्या शिष्टमंडळात देखील धुळाभाऊ अनुपस्थित होते.
पश्चिम भागातील चळवळीतील कार्यकर्ते प्रा शिवाजीराव बंडगर व माजी आमदार नारायण पाटील यांच्यातील संबंध आणखी सुधारलेले नाहीत, त्यामुळे पश्चिम भागातील पाटील गटाची चळवळ थंडावलेली असताना धुळाभाऊ कोकरे यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमा असलेला नेता गमावणे पाटील यांना मोठे नुकसान कारक ठरणार आहे. बंडगर हे जसे धनगर आरक्षण, विद्यापीठ नांमतार चळवळ व समाजाच्या विविध प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असल्याने तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचले आहेत तसेच धुळाभाऊ कोकरे यांचे त्यांच्या कुगाव सह उदरंगाव, चिखलठाण, रिटेवाडी, जेऊरवाडी, पुर्व सोगाव, मांजरगाव या गावात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे प्रा शिवाजीराव बंडगर व धुळाभाऊ कोकरे यांच्यासारखे नेते दुखावणे पाटील गटास तोट्याचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीत टिकीट वाटप ,मानापमान यावरून प्रत्येक गटात अनेक जण नाराज होणार आहेत, या मध्ये बेरजेचे राजकारण करणारा नेता यशस्वी होणार आहे.आत्ता पाटील गटाकडून बेरजेचे राजकारण होते का? हक्काचे शिलेदार गमवावे लागणार हे येणारा काळच ठरणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.