loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार नारायण पाटील यांनी फेटाळला महावितरण चा प्रस्ताव, शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार.

कार्यकारी अभियंता कुऱ्हाडे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे भेट घेतली असून यावेळी झालेल्या बैठकीत वीज कनेक्शन कपातीमुळे झालेल्या नुकसानीसह वीज बिल रकमेवर दीर्घ काळ चर्चा झाली.या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील हे शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम राहिले असून महावितरण कडून वीज बिल पोटी सहा बीलां ऐवजी पाच बीले भरुन घेतल्यास वीज कनेक्शन जोडण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. परंतू हि सवलत असुन नसल्यासारखी असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांनी महावितरणचा हा प्रस्ताव फेटाळला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी महावितरणच्या समोर दोन प्रस्ताव ठेवले असुन त्यानुसार एक तर प्रत्येक ट्रान्सफॉर्मर नुसार एकत्रीतपणे 50 हजार रुपये भरुन घ्यावेत अथवा प्रति एच पी एक हजार रुपये नुसार बिल रक्कम भरुन घेऊन तातडीने वीज कनेक्शन जोडून द्यावेत अशी मागणी केली. तसेच यावेळी मा आ पाटील यांनी उजनी काठच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे पिकांच्या झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीचे व्हीडीओ व फोटो कार्यकारी अभियंता यांना दाखवले.यावर आता अधिक्षक अभियंता सोलापुर यांचेसमोर आजच्या बैठकीतील शेतकऱ्यांचे वीज बिलाविषयीचे प्रस्ताव तसेच पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत तातडीने चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासीत केले असल्याने आजच्या बैठकीतील निर्णय लांबणीवर पडला असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.महावितरणच्या अंतिम निर्णयाची आपण वाट पहात असुन त्यानंतर जर सकारात्मक प्रतिसाद महावितरण कडून न मिळाल्यास आगामी आंदोलनाबाबतचा निर्णय सर्व शेतकऱ्याची मते विचारात घेऊन घेतला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आजच्या या बैठकीस जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ, सभापती अतुल पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, सदस्य चौधरी, बाजार समिती सदस्य रणसिंग बापू, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, महेंद्र पाटील, घोटीचे सरपंच सचीन राऊत, वांगी ग्रा प सदस्य रामेश्वर तळेकर, सुरेश नरुटे आदि उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान महावितरण च्या विरोधात शेतकऱ्यांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असून सकारात्मक निर्णय न झाल्यास महावितरण व शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts