loader
Breaking News
Breaking News
Foto

वीज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महावितरण व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात बैठक सुरु!निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष.

जेऊर येथे महाविरतण व माजी आमदार नारायण पाटील यांच्या मध्ये वीज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कुऱ्हाडे साहेब तसेच सहायक अभियंता श्री गलांडे साहेब, श्री जाधव साहेब यांच्यासह तहसील कार्यालय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

काल माजी आमदार नारायण पाटील यांनी वीज तोड व वीज बिल वसुली थांबवून वीजपुरवठा पुर्ववत करावा यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनास शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार समीर माने यांनी आंदोलनकर्ते व महावितरण यांच्यात समन्वय साधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले परंतू माजी आमदार नारायण पाटील आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने आज परत एक बैठक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या बैठकीकडे संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts