करमाळा चौफेर शी बोलताना आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत बाबत भाजपाची भुमिका चिवटे यांनी स्पष्ट केली असुन ते म्हणाले की पक्ष संघटन सामाजिक कार्य, व उद्योगाच्या माध्यमातून भाजपाची वाढती ताकद लक्षात घेता तालुक्यातील अनेक गट भाजपा सोबत युती करण्यासाठी इच्छूक आहेत मात्र सन्मानजनक जागा वाटप न झाल्यास या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असुन सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभा करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.
याबाबत अधिक बोलताना चिवटे म्हणाले की करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहचले असुन बुथ कमीटी यंत्रणा प्रभावी पणे काम करत आहे.भाजपा अंतर्गत असलेल्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्याचे काम जोमाने सुरु असुन भाजपा मधुन उमेदवारी घेण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत असे ते म्हणाले.
दुग्ध व्यवसाय च्या माध्यमातून प्रत्येक गावातील जवळपास पन्नास ते साठ जणांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करुन दिला असुन तालुक्यातील शेकडो युवकांना रोजगार मिळाला आहे. तसेच भाजपाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण राबवीले जात आहेत, कोरोना काळात अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजपाने चमकदार कामगिरी करत सरपंच उपसरपंच पदासह शेकडो ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत असे देखील चिवटे यांनी स्पष्ट केले असुन या सर्व बाबींचा आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास देखील चिवटे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार च्या कारभाराविरुद्ध ग्रामीण भागातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे.दर दोन महिन्यांत वीज पुरवठा खंडित करुण शेतकऱ्यांना खिंडित गाठले जात असून पठाणी वसुली महावितरण करत आहे. फडणवीस सरकार च्या काळात शेतकऱ्यांना कधीही त्रास झाला नाही असे शेतकरी बोलत आहेत. वीज कनेक्शन कट करण्यावरून सत्ताधारी मुग गिळून गप्प बसत आहेत याचा राग शेतकरी आगामी निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त करतील असे देखील चिवटे यांनी सांगीतले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.