शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसूली तातडीने थांबवून आठ तास अखंडीत वीज पुरवठा करा, अन्यथा आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल असा इशारा आज माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलनस्थळी महावितरण व प्रशासनास दिला. करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा हा सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या नावाखाली सध्या खंडीत झाला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावर शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी आज माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना मा. आ .पाटील म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असुन वीज बिल वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्याच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबूरीने वसुली करावी. वरीष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक असुन तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकार्यांनी वरीष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे. असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना केले आहे.थ्री फेजसह सिंगलफेज वीज पुरवठा सुध्दा बंद करुन महावितरण आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय ?असा सवाल करत जर तातडीने सर्व वीजपुरवठा सुरु करुन आठ तास सलग वीज नाही दिली तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला.प्रास्तविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.
यावेळी तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व महावितरणचे जेऊर तसेच करमाळा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले व त्यांनी निवेदन स्विकारले. यानंतर तहसीलदार यांच्या दालनात पोलीस निरिक्षक व महावितरण अधिकारी यांचे सोबत माजी आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळ यांनी चर्चा केली. महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरुन थेट संभाषण करुन यावर परत उद्या आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे नक्की झाले.तो पर्यंत तातडीने सिंगल फेज वीज सुरु करुन थ्री फेज वीज पुरवठा दोन तास देण्याची हमी महावितरणकडून देण्यात आली व लगेच कार्यवाही झाली.
उद्या वसुलीच्या रकमेबाबत व सवलतीबाबत तोडगा निघणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी जि प सदस्या सवितादेवी राजेभोसले, व बिभीषण आवटे, सभापती अतूल पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे,माजी उपसभापती दत्ता सरडे,नागनाथ लकडे, बिले सर, पृथ्वीराज पाटील, महेश चिवटे, देवानंद बागल, राजाभाऊ कदम जयराम सोरटे ,महेंद्र पाटील, डाॅ अमोल घाडगे, धुळाभाऊ कोकरे, रमेश कांबळे, संतोष जाधव-पाटील, दत्ता गव्हाणे, गणेश चौधरी, रणसिंग बापू, रामेश्वर तळेकर, हनूमंत सरडे यासह अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.