loader
Breaking News
Breaking News
Foto

सक्तीची वीजबिल वसुली करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका - दिग्विजय बागल

करमाळा तालुक्यात सध्या चालू असलेली सक्तीची वीज वसुली बंद करावी व वीज पुरवठा खंडीत करु नये, शेतकरी वर्गामध्ये याबाबत तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. काहीतरी मध्य साधत उपाय काढावे असे आवाहन मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी माहिती देत असताना ते म्हणाले की, महावितरण कंपनीने सावकारापेक्षा जाचक पध्दतीने बळीराजाला ऐन रब्बी हंगामात वेठीस धरून वीज पुरवठा खंडित करत वसुलीचा तगादा लावला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पुढे ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही सक्तीची वसुली बंद करुन कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत न करण्याची मागणी केली होती. तूर्तास वसुली थांबवलीही होती व त्यातून एक मध्य निघालाही होता. परंतू परत महावितरण कंपनीने वसुली सुरू केली आहे. दर दोन महिन्याला हा वसुलीचा प्रकार घडत आहे.यावर पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उन्हाचे वाढते प्रमाण यातून खरीपाची पीके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही, पाणी आहे पण वीज नाही, यामुळे शेतकऱ्यांसोबत जनावरांचे देखील हाल होत आहेत. पीक विम्याचे पैसे देखील अद्याप मिळालेले नाहीत. सगळीकडूनच शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.यावर उपाय म्हणून बिलाबाबत शासनाने OTS(वन टाइम सेटलमेंट) करावे. काहीतरी तडजोड करून सदर विजबिलबाबत निर्णय करावा. विजबिलासाठी हफ्ते पाडून द्यावेत, सलग विजतोड करणे हा कुठला न्याय? असेही ते म्हणाले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लवकरात लवकर लाईट जोडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मकाई सहकारी साखर करखाण्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts