रोहित दादा पवार यांनी करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला असून, रोहित पवार यांनी आदिनाथ च्या भाडे करारात घोळ घातल्यामुळे आदिनाथ चे दोन वर्षाचे भाडे व वाढलेले व्याजदर मिळून 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे . कारखाना बंद राहिल्याने उस उत्पादक शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची जबाबदारी घेऊन आमदार रोहित पवार यांनी करमाळा तालुक्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक देवानंद बागल यांनी केली आहे.
आदिनाथ कारखाना सुरु न झाल्याने शेतकरी सभासद वर्गातून पवार -बागल यांच्या विरोधात वातावरण पेटले आहे. करमाळा तालुक्यात शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ बचाव समिती स्थापन झाली असून या समितीचे फाऊंडर मेंबर असलेले व नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक देवानंद बागल यांनी रोहित पवार यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजणार आहे.सहकार चे जाणते राजे कारखाना क्षेत्रातील दैवत म्हणून ज्यांची ओळख आहे अशा खा . शरदचंद्र पवार यांचे नातु असलेल्या आमदार रोहीत पवार यांच्यावर भाडेतत्त्वावर घेतलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पुर्ण करुन शेतकऱ्यांचा विश्वास कमवता आला नसल्याने आगोदरच शेतकऱ्यांकतुन नाराजीचा सुरु होता. त्यातच रोहित पवार यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आशी मागणी होवु लागल्याने पवार कुटुंबीयवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
दोन वर्षापूर्वी करमाळा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार शामलताई बागल यांच्या ताब्यात असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना उस उत्पादक,वाहन मालक व कामगार यांची देणी थकल्याने अडचणीत आला होता. हा कारखाना कर्जत जामखेड चे आमदार रोहीत पवार चालवण्यास घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर पवार कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव पाहता कामगार, सभासद यांना आदिनाथ पुर्व पदावर येवून सर्वाना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पंधरा वर्षाच्या करारावर घेणार की पंचवीस वर्षांच्या यावरून संभ्रम होता तसेच कारखान्याची जप्ती बॅंकेने केली असल्याने करार प्रकिया रखडली. मात्र करार झाला असून तांत्रिक बाबी मुळे उशीर होत असल्याचे बागल व पवार यांच्याकडून सांगीतले जात होते. दरम्यान या वर्षी उस क्षेत्र वाढले व आदिनाथ बंद असल्याने ऊसउत्पादक शेतकरी प्रंचड अडचणीत सापडला .एक एकर उस तोडण्यास दहा हजारा पर्यंत मागणी होवु लागली. आदिनाथ सुरु असता तर हि परिस्थिती झाली नसती अशी भावना झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत होता यातुच बचाव समिती स्थापन झाली व आज थेट रोहीत पवार यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आल्याने पवार कुटुंबीयाची चांगलीच गोची झाली आहे.सुरवातीला राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजयमामा शिंदे गटाकडून आदिनाथ बचाव हाक देत आमदार शिंदे समर्थक माजी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत सरडे ,माजी सभापती चंद्रहास निमगीरे, सुनील सावंत, सुजित बागल, मानसिंग खंडागळे यांनी पुढाकार घेतला होता व बैठकीचे आयोजन केले होते त्यामुळे आमदार शिंदे यांचा या मागे हात असल्याची चर्चा होती मात्र ऐनवेळेस शिंदे गटाचा एकही समर्थक पुढारी या बैठकीस फिरकला नसल्याने शिंदे गटाच्या या युटर्न च्या चर्चा सुरु असताना आज शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक देवानंद बागल यांनी आमदार पवार यांनी तालुक्यातील जनतेची माफी मागावी असा हल्लाबोल करत खळबळ उडवून दिली आहे. पाटील गटाकडून मध्यंतरी कराराची संपूर्ण माहीती हाती आल्यानंतरच माजी आमदार नारायण पाटील हे आपली भूमिका मांडतील असे अधिकृतपणे सांगण्यात आले असुन जर करार प्रक्रियेत संबंधितास अडचणी आल्या व आदिनाथच्या सुरु होण्याची प्रक्रिया ठप्प झाली तर त्यापुढे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ सुरु होण्याबाबत वरीष्ठ नेतेमंडळींना गळ घातली जाईल अथवा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊन आदिनाथ सुरु करण्याबाबत न्याय मागितला जाईल असे सांगण्यात आले होते. यामुळे सद्यस्थितीची माहिती नसल्याने पाटील गटाकडुन आदिनाथ बाबत सावध पाऊले उचलली जात असल्याचे दिसून येत होते.शिंदे गटाकडून माघार घेतली गेल्यानंतर मात्र आज पाटील गटाच्या समर्थकांकडून आक्रमक भुमीका घेतली गेल्याने देवानंद बागल यांची मागणी म्हणजे माजी आमदार नारायण पाटील यांचीच हि भुमिका आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.