loader
Breaking News
Breaking News
Foto

दुध संघाला 'गतवैभव' मिळवून देण्यासाठी दुध संघ बचाव च्या उमेदवारांना विजयी करा! - अरुण लोंढे

करमाळा, ता. २४ : अडचणीत असलेला सोलापूर जिल्हा दूध संघ सुरळीत करण्यासाठी व दुध संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी दुध संघ बचाव च्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केम येथील गोकुळ दूध संस्थेचे सचिव व करमाळा तालुक्याचे प्रचार प्रमुख अरुण लोंढे यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरु आहे.आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून उद्या (ता. २६) रोजी यासाठी मतदान होत आहे. दूध संघाच्या निवडणुकीत ३१६ मतदार आहेत. त्यात करमाळ्यात ३९ मतदारांचा समावेश आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले जात होते. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत ३१ उमेदवार रींगणात आहेत. त्यात दूध संघ बचाव पॅनेलचे ११ उमेदवार आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली होमटूहोम प्रचार सुरु असून यात दूध संघ बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. करमाळा तालुक्यात महिला मतदार संघातून संगीता लोंढे यांचा समावेश आहे. लोंढे म्हणाले राजेंद्र राजे भोसले यांच्या सारख्या अनुभवी माणसाची उमेदवारी कट करून त्यांच्यावर सत्ताधारी गटाने केला आहे. अध्यक्ष पदात त्यांची अडचण नको म्हणून त्यांना डावलले असल्याचा आरोप करत ज्यांचे दूध संघात जात नाही त्यांना उमेदवारी दिली जाते आणि संघ अडचणीत घातला जातो. या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दूध संघ बचाव पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा, असे ते म्हणाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अतितटीच्या या लढतीत प्रस्थापितांविरुद्ध सामान्य सभासद असा लढा निर्माण झाला असून जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts