शिवजयंती निमित्त शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ८७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये खुल्या गटातून समृद्धी निळ, राजेश्वरी जगदाळे,राहुल सरवदे लहान गटातून विराज,कणसे, विराज नाईकनवरे,आरव चोरगे तर मोठ्या गटातून प्रतिक्षा फरतडे,अनन्या साळूंखे,अयाज फकीर ठरले बक्षीसाचे मानकरी
येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व साह्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून करण्यात आले या स्पर्धेत जिल्हाभरातून ८७ स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा.लक्ष्मण राख,प्रा. एस. पी.जाधव प्रा. नंदकिशोर वलटे अश्विनी चोरगे यांनी काम पाहिले.
यावेळी विजेत्यांना ट्राफी, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन प्रा.अरविंद दळवी, प्रा.महेश निकत, कल्याणराव साळूंके, विवेक पाथ्रुडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिवभक्त हानुमंत जगताप यांचे वतीने फळझाडाचे रोपे भेट देण्यात आले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.