आदिनाथ सहकारी साखर कारखान्याऐवजी मकाई सहकारी साखर कारखाना चालवण्यास द्यावा ,पण आदिनाथ चा व्यवहार करु नये. असा बागलांना सल्ला देत आदिनाथ बचाव साठी सर्व पक्षीय बैठक बोलवणारे व वेळप्रसंगी हायकोर्टात जाण्याचा इशारा देणारे आमदार संजयमामा शिंदे समर्थक माजी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत सरडे यांनीच काल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दत्त मंदिर येथे झालेल्या 'आदिनाथ बचाव' बैठकीकडे पाठ फिरवल्याने सरडे यांनी अचानक युटर्न का घेतला? यावरून आत्ता जोरदार चर्चा सुरू आहे.सरडे यांच्यासह आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक असलेले सुनील सावंत यांनी देखील आदिनाथ ची झालेली ऑनलाइन सभा बेकायदेशीर असून सभासदांची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात यावी भाडेतत्त्वाचा करार रद्द करण्यात यावा आशी मागणी करताना तालुक्यातील दिवंगत नेत्यांनी रक्ताचे पाणी करून उभा केलेला हा आदिनाथ कारखाना लालसेपोटी कवडीमोल दराने रोहीत पवार यांच्या दावणीला बांधण्याचा संचालक मंडळाचा हा डाव म्हणजे घरची दुभती गाय कसायाच्या दावणीला बांधण्याचा प्रकार असल्याची टिका केली होती. मात्र काल झालेल्या बैठकीस सावंत यांनी देखील उपस्थिती लावली नाही. सरडे ,सावंत यांच्याबरोबरच शिंदे याचे समर्थक मानसिंग खंडागळे सुजित बागल हे देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती मात्र काल आमदार संजय मामा शिंदे यांच्या समर्थकांनी या बैठकीस येण्याचे का टाळले यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे काल आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा येथे कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागता साठी सकाळ पासून ठाण मांडून होते त्या वेळेस सरडे ,सावंत ,सुजित बागल देखील त्याठिकाणी उपस्थित होते बचाव समितीतील काही नेते त्यांना सतत फोन करत होते मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे देखील चर्चा आहे.आमदार संजय मामा शिंदे यांच्या दिल्ली वारी व शरद पवार यांच्या भेटीनंतर सुरु झालेल्या आदिनाथ बचाव चळवळी मुळे आमदार संजय मामा शिंदे हेच यामागचे कर्ते करविते आहेत का? अशा देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळेच पवार यांची नाराजी नको म्हणून शिंदे यांनीच आपल्या समर्थकांना या बैठकीत जाण्यापासून रोखले का? अशी चर्चा सुरु आहे.दरम्यान 32 हजार सभासद संख्या असलेल्या सभासदांची देखील उपस्थिती म्हणावी तेवढी दिसुन न आल्यानी सभासदांची उदासिनता व बेफिकीरपणा पुन्हा एकदा ठळक पणे दिसुन आला.
आदिनाथ बचाव साठी सर्व पक्षीय एकत्रित येणार असल्याचे सांगितल्याने शिंदे गटाबरोबरच मोहिते-पाटील गटाकडून अजीत तळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची नावे येत होती मात्र अजीत तळेकर देखील या बैठकीस गैरहजर होते. मात्र अन्य मोहिते-पाटील व नारायण पाटील, बागल समर्थक नेते तसेच आदिनाथ चे आजी माजी संचालक चेअरमन व्हा चेअरमन उपस्थित होते. पुढे आत्ता या आदिनाथ बचाव समितीची एकत्रित मोठ बांधली जाणार का? सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येणार का? बचाव समितीची पुढची रणणीती काय असणार? बचाव समीतीची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार? समितीला सभासदांचे पाठबळ मिळणार का? व सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहीत पवार यांच्याबरोबर करार करण्यासाठी सुरु असलेली प्रक्रिया थांबणार का? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.