अजितदादा पवार विद्यालयाचा अनोखा उपक्रम ! यांना दिला जातो ध्वजावंदनाचा मान. "> माझी मुलगी ज्ञानेश्वरी कदम याच विद्यालयात शिकत असुन तिचा या वर्षी विद्यालयात प्रथम क्रमांक आल्याने शाळेच्या वतिने मला धव्जारोहणाचा मान मिळाला शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद असुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारा आहे.इतर विद्यालयाने याचे अनुकरण करणे गरजेचे आहे -सतिश कदम (पालक) ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादा पवार विद्यालयाचा अनोखा उपक्रम ! यांना दिला जातो ध्वजावंदनाचा मान.

ग्रामपंचात च्या ठिकाणी सरपंच, तर शाळा व विद्यालयात शाळा समिती अध्यक्ष किंवा संस्था चालकांच्या हस्ते धव्जारोहण केले जाते. त्या मुळे गावातील सर्व सामान्य व्यक्तीला ,तर शाळेत पालकांना ध्वजारोहण करण्याची संधी सहसा प्राप्त होत नाही. मात्र वडशिवणे ता करमाळा येथील अजितदादा पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक बि .आर भोसले यांच्या संकल्पने मुळे सर्व सामान्य पालकांना गेल्या आकरा वर्षा पासुन ध्वजारोहण करण्याची संधी मिळत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दहावीच्या परिक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या हस्ते १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी तर द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या हस्ते २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करु अशी संकल्पना विद्यालयाचे मुख्याध्यापक बि .आर भोसले यांनी विद्यालयाचे संस्थापक सचिव मारुती पारखे साहेब अध्यक्ष भुजबळ साहेब व सहकारी शिक्षकांसमोर मांडली हि संकल्पना सर्वांना आवडल्याने गेल्या अकरा वर्षा पासुन प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण होत आहे. पालकांतुन देखील या उपक्रमाचे चांगले स्वागत होत आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हाच हेतु डोळ्यासमोर ठेवुन हा उपक्रम सुरु केला असुन त्याचा चांगला परिणाम दिसुन येत आहे या उपक्रमाचे हे आकरावे वर्ष असुन या पुढे प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सपत्नीक ध्वजारोहण चा मान देण्याचा विचार आहे .बि आर भोसले -( मुख्याध्यापक अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे)

- विशेष प्रतिनिधी सा चौफेर

आपल्या पालकांना हा मान मिळावा या साठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागत असुन त्या मुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व विद्यालयाचा निकाल वाढत आहे.तसेच ध्वजारोहणाच्या मान स्नमाना मुळे होणारे मानापमान नाट्य बंद झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मा- माझी मुलगी ज्ञानेश्वरी कदम याच विद्यालयात शिकत असुन तिचा या वर्षी विद्यालयात प्रथम क्रमांक आल्याने शाळेच्या वतिने मला धव्जारोहणाचा मान मिळाला शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद असुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारा आहे.इतर विद्यालयाने याचे अनुकरण करणे गरजेचे आहे -सतिश कदम (पालक)

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts