आदिनाथ सहकारी साखर कारखाना दोन वर्षापूर्वी बारामती ॲग्रो भाडेकराराने चालविणाऱ्या वृत्ताने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र रोहित पवार यांनी जाणीवपूर्वक दोन वर्ष कारखाना चालवण्यास विलंब लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे यामुळे आता रोहित दादा पवार यांनी आदिनाथ च्या प्रक्रियेतील स्वतःहून माघार घ्यावी अशी मागणी आज आदिनाथ बचाव समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली .शिवाय बारामती ऍग्रो ला दिलेला भाडेकरार ठराव तातडीने संचालक मंडळाच्या बैठकीत व विशेष सर्वसाधारण सभा घेऊन रद्द करावा अशी मागणी बागल गटाचे नेते रश्मी दिदी बागल यांच्या कडे जाऊन करण्याचा ठराव संमत झाला
आजच्या बैठकीसाठी डॉक्टर वसंतराव पुंडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, मार्केट कमिटीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजी बंडगर ,आदिनाथ चे माजी चेअरमन संतोष पाटील ,उपाध्यक्ष रमेश कांबळे, संचालक किरण कवडे ,नितिन जगदाळे, चंद्रहास निमगिरे ,बागल गटाचे कल्याणराव सरडे ,सतीशराव नीळ, बारीक राव देशमुख ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके रवींद्र गोडगे ,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा सुपनर, भीमराव येडे, उदयसिंह मोरे पाटील महेंद्र पाटील गिरमकर, एडवोकेट देशपांडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे डॉक्टर घाडगे पत्रकार संतराम सुळ अशोक तकीक ,दादासाहेब लबडे, भारत शिंदे , पदाधिकार्यांसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
यावेळी बोलताना देवानंद बागल म्हणाले की आदिनाथ ही सहकारी संस्था असून सहकार तत्वावर असली पाहिजे आज खाजगी कारखाने शेतकऱ्यांची लूट करत आहेत तीनशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी असलेला कारखाना केवळ शंभर कोटी रुपयांच्या कर्जासाठी लुटण्याचा बारामतीकरांच्या डाव उलटून टाकण गरजेचे आहे.यावेळी राज्य सहकारी बँक व दिल्लीचा इन सिटी बँकेचे कर्जाचे पुनर्गठन करून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या माध्यमातून या कारखान्याला अर्थसहाय्य उपलब्ध करून द्या वर देण्यात मदत करू तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले. हा कारखाना सहकार तत्त्वावर चालू करावा अशी बागल गटाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असून आम्ही यासंदर्भात आमचे नेत्या रश्मी बागल यांच्याकडे मागणी करू व तसा ठराव आदिनाथ संचालक मंडळात व सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेऊ असे आश्वासन यावेळी सतीश नीळ व कल्याण सरडे यांनी दिले या बैठकीसाठी तालुक्यातील प्रमुख बागल गट नारायण पाटील गट जयवंतराव जगताप गट सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते .दोन दिवसात कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व बागल गटाचे नेते रश्मी बागल कोलते यांच्याशी प्राथमिक बैठक करून पुढील निर्णय घेऊ असे शेवटी निमंत्रक वसंतराव पुंडे यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.