राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी सुरू केलेली राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा आज करमाळ्यात आमदार संजय मामा शिंदे संपर्क कार्यालय येथे संपन्न झाली . या परिसंवाद यात्रेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रेय भरणे मामा या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज व कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक सुरेश घुले, प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील , जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सोलापूर जिल्हा पक्षनिरीक्षक शरद भाऊ लाड, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर ,राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले तसेच करमाळा तालुक्यातील महिला, युवक ,युवती संघटनांचे व सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासरत्न आमदार म्हणून आ. संजयमामा शिंदे यांचा सत्कार याप्रसंगी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील व पालकमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी केले ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,पवार कुटुंब व शिंदे कुटुंब यांचा अनेक वर्षापासून निकटचा संबंध आहे. पक्षाच्या पडत्या काळातही पक्षाला साथ देण्याचे काम शिंदे कुटुंबियांचे राहिले आहे.आज मी अपक्ष आमदार असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारसरणीपासून दूर गेलेलो नाही. पक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यासाठी कोरोना सारखे महाभयंकर संकट असताना भरीव निधी मला खेचून आणता आला. भविष्यकाळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवणे यासाठी पक्षाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीमध्ये सर्वांनी संघटितपणे काम केल्यामुळे कोरोना सारखे संकट वेळीच रोखता आले ही समाधानाची बाब असल्याचा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. या वर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने मधून जवळपास एक हजार किलोमीटर रस्ते सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर होऊन येतील ही खूप महत्त्वाची बाब असल्याचे आवर्जून सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.