करमाळा चौफेर च्या बेधडक सदरातुन काल आदिनाथ च्या कराराचे गौडबंगाल काय?व मोहिते-पाटील ,जगताप ,नारायण पाटील यांचे मौन का? या मथळ्याली सविस्तर भाष्य करण्यात आले होते .शेतकरी सभासद वाचकांतुन या लेखाचे जोरदार स्वागत झाले होते.व राजकीय वर्तुळात देखील दिवसभर या बातमीची चर्चा होती. बेधडक या सदरातील लेखाची पाटील गटाकडून दखल घेतली असून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भुमीका स्पष्ट केली. माजी आमदार नारायण पाटील हे आदिनाथ बाबत भाडेतत्त्वावर देण्याच्या कराराची सद्यपरिस्थिती व तपशीलवार माहिती घेऊनच आपली भूमिका मांडणार असून वेळ पडल्यास आदिनाथ सुरु करण्याबाबत काही अडचणी येत असतील तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी ठेवणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ कारखान्याच्या भाडेतत्त्वावर असलेल्या कराराबाबत अजून विद्यमान संचालकमंडळ पुर्ण माहिती उघड करत नसल्याने सभासदांमध्ये संभ्रमवस्था आहे. हि प्रक्रिया थांबल्यानंतरच आदिनाथ बाबत पुढील धोरण ठरवणे सहजशक्य होईल. स्व कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांच्या त्यागातून व अविरत कष्टातुन आदिनाथची उभारणी झाली आहे. यामुळे आदिनाथला आता संकटसमयी परत उभारण्यासाठी व गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे समर्थ आहेत. आदिनाथचा केवळ राजकीय उपयोग होता कामा नये हि माजी आमदार पाटील यांची अगदी सुरुवातीच्या पासुनची भुमिका आजही कायम आहे. आदिनाथची उभारणी करताना कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी केलेला त्याग व कष्ट हे नारायण आबा पाटील यांनी अगदी जवळून पाहीले आहे. त्यावेळी स्व. बापुंना काही टिका टोमणेही सहन करावे लागले याच्या यातना मा आ पाटील यांनी सुध्दा भोगल्या आहेत. यामुळे आदिनाथ बाबत माजी आमदार नारायण पाटील हे मौन धरुन असल्याच्या वृत्ताचे खंडन आम्ही करत आहोत असे देखील तळेकर यांनी स्पष्ट केले.
आदिनाथ वाचला पाहीजे याबद्दल पुर्ण माहिती घेऊनच धोरण ठरवणे अधिक योग्य होणार आहे. यानंतरच कायदेशीर अथवा देश आणि राज्य पातळीवरील नेतृत्वांची मनधरणी करुन आदिनाथ चालू व्हावा म्हणून उपाययोजना करणे सोपे जाईल. सध्या आदिनाथ चालू व्हावा अशी भुमिका घेऊन जी मंडळी एकत्र येऊन काहीतरी आदिनाथ, सभासद व कामगार हिताची चर्चा करत असतील तर या सर्वांच्या भुमिकेशी पाटील गट सहमत असुन ठामपणे मागे उभा राहील. केवळ आपल्याच कोंबड्याने बाग दिली तर दिवस उगवेल हि भुमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी कधी बाळगली नाही. आदिनाथच्या भल्याबाबत जे कोणी प्रयत्नशील आहेत त्यांना निश्चितच भक्कमपणे साथ दिली जाईल.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.