loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढेजच्या विकासासाठी कटिबद्ध असुन ग्रामपंचायतीचा कारभार कौतुकास्पद -पृथ्वीराज पाटील

कोंढेजच्या विकासासाठी कटिबद्ध असुन ग्रामपंचायतीचा कारभार कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन करमाळा तालूक्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोंढेज येथील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोंढेज येथे आज गावांतर्गत लहान रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. बादलवाडा रस्ता, लोंढे-भोरे रस्ता, सालसकर-आदलिंग रस्ता या ठिकाणी आता पेव्हर ब्लॉक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या सर्व कामांचे भूमीपूजन युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार आदिनाथ आदलिंग तर माजी आमदार नारायण पाटील यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील यांचा सत्कार धर्माण्णा आदलिंग यांनी केला. रामभाऊ जगताप व नानासाहेब जाधव यांचे सत्कार गोविंद लोंढे व निलेश राऊत यांनी केले. यावेळी सरपंच सौ छाया कांतिलाल राऊत, उपसरपंच शहाजीबाबू राऊत, ग्रा प सदस्या सौ अश्विनी गणेश सव्वाशे, सदस्य गोविंदनाना लोंढे, माजी उपसरपंच हनूमंतबापू बादल, माजी उपसरपंच नानासाहेब आदलिंग, गणेश सालसकर, काकासाहेब साबळे, संजय लोंढे, तंटामुक्त समीती अध्यक्ष गणेश सव्वाशे, बापुराव आदलिंग, निवास सालसकर, चंद्रकांत बोराडे, राहुल भोरे, संग्राम राऊत, दत्ता आरणे, बबनराव माने, गणेश कोष्टी, तात्या गुरव, सतीश सालसकर, अमोल आदलिंग, दिलीप सालसकर, सोमनाथ आरणे, मारुतीनाना लोंढे सोनाजी भोरे आदि उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी गावातील पिण्याच्या पाणी व्यवस्थेची पाहणी करुन ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतूक केले. तसेच गावातील ब्रिटीश कालीन पाणवठा (आड) यांना भेटी दिल्या.प्रास्तविक निवास सालसकर यांनी केले तर आभार उपसरपंच शहाजीबापू राऊत यांनी मानले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts