loader
Breaking News
Breaking News
Foto

"माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या कामांचे श्रेय तर तुम्ही घेतंच आहात, आमदारांनी किमान प्रशासनाच्या कामाचे तरी श्रेय घेऊ नये -सुनील तळेकर

"माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या कामांचे श्रेय तर तुम्ही घेतंच आहात, मामासाहेब किमान प्रशासनाला तरी यातून सोडा", असा मार्मिक टोला लगावत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आज "आमदार आपल्या दारी " या आ. संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेवर बोट ठेवले.याबाबत सविस्तर बोलताना प्रवक्ते तळेकर म्हणाले की,शासनाने प्रशासन लोकाभिमुख, गतीमान व सुलभ होण्याकरिता आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजना म्हणून 1 मे 2011 पासुन "सुवर्ण जयंती राजस्व अभियान" सुरु केले अशी माहिती बहुतांश शासकीय संकेतस्थळावर शासनाकडून उपलब्ध आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या अभियानात प्राधान्याने नागरिक व लाभार्थी यांना सर्व प्रकारचे शासकीय दाखले दिले जातात, तसेच शासनाच्या विविध लाभ योजनेत नावे नोंदवून घेतली जातात. सन 2009 ते 2014 तत्कालीन आमदार शामलताई बागल व सन 2014 ते 2019 तत्कालीन आमदार नारायण पाटील यांच्या कालावधीत त्यावेळी कार्यरत तहसीलदार यांनी हे शासकीय अभियान करमाळा तालूक्यात अनेक गावी राबवले, याची दफ्तरी नोंद आहे. हा एक शासकीय उपक्रम असुन प्रशासनाशी संबधित असल्याने अधिकारी त्यांच्या स्तरावर हा उपक्रम नेहमी राबवत आले आहेत .या अभियानास केवळ आमदारच नव्हे तर त्या जि.प गटातील वा पं.स गणातील सर्वच लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडून आमंत्रित केले जाते,हा शासकीय नियमावली व राजशिष्टाचार याचा एक भाग आहे. परंतू आ शिंदे यांनी या शासकीय अभियानास "आमदार आपल्या दारी" असे नाव देऊन इतर लोकप्रतिनिधीना न बोलविता या अभियानाला राजकीय स्वरुप दिले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रशासनाच्या प्रयत्नांचेही श्रेय घेणे हा अत्यंत केविलवाणा असा प्रयत्न आमदार संजयमामा शिंदे हे करत आहेत. आज दोन वर्षे झाली तरी करमाळा तालुक्यात जमिनस्तरावर प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहता येईल असं एकही विकासकाम आमदार शिंदे करु शकले नाहीत. यामुळे आता किमान प्रशासनाला तरी राजकारण विरहीत भरीव कामे करण्यासाठी मोकळीक द्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संजय गांघी निराधार योजना तसेच श्रावणबाळ व अन्य योजना आदिसाठी तालुकास्तरीय समिती असते व आमदार हे या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात. या समितीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून लोकनियुक्त सदस्य नेमले जातात.तत्कालिन आमदार शामलताई बागल यांनी आमदार पदाच्या व्यस्ततेमुळे या समितीची जबाबदारी जेष्ठ समाजसेवक सेवक अॅड. बाबूराव हिरडे यांचेवर सोपवली होती तर 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी ही जबाबदारी प्रा शिवाजीराव बंडगर यांचेवर सोपवली होती. आमदार शिंदे यांच्या काळात गेली दोन वर्षे झाली हि समितीच पुर्नगठीत केली नाही. तहसिलदार यांनाच या समितीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. आ. शिंदे यांनी या समितीची एकही बैठक घेतली नसावी. लोकनियुक्त सदस्यां शिवाय कामकाज चालू आहे. कोरोनाच्या कठीण कालावधीत निराधारांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आमदारांच्या प्रशासनावरील पक्कड व दक्ष कार्यप्रणालीचे ढोल वाजवणे आता जरा बंद करा. लोकाभिमुख कारभार कसा असतो हे माजी आमदार नारायण पाटील यांनी 2014 ते 2019 या कालावधीत दाखवून दिले आहे. करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये एकाच कामासाठी अनेक हेलपाटे माजी आमदार नारायण पाटील यांच्या कालावधीत तरी मारावे लागले नव्हते.यामुळे आज जर तहसिलदार व गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी दक्ष राहुन एक चांगली कार्यप्रणाली या तालुक्यात राबवत असतील तर आमदार महोदयांनी यास पाठबळ द्यावे, पण "आमदार आपल्या दारी "असे नाव देऊन गावोगाव न जाता कुठेतरी आपल्याला सोयीस्कर अशा ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करायला लावून "सुवर्ण जयंती राजस्व अभियाना"चे कार्यक्षेत्रात संकुचित करु नये. प्रशासनाला मोकळीक देऊन हे अभियान गावोगाव राबवू द्यावे. तालूक्यात दोन वर्षात अनेक विकासकामे रखडलेली आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असेल तर या कामांना शासनाच्या तिजोरीतीतून विकासनिधी आणुन प्रत्यक्ष काम करुन दाखवावे, कागदी घोड्यांचा नाच आता थांबवावा, असा हल्लाबोल प्रवक्ते सुनील तळेकर यांनी यावेळी केला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts