आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे यांच्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात खोलवर पसरले असून विविध चर्चांना उधाण आले आहे. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे हे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक असुन त्यांनी नुकतेच एका प्रसिध्दी माध्यमास मुलाखत देताना आदिनाथ कारखान्याच्या करारा बाबत वक्तव्य केले आहे. यावेळी चंद्रकांत सरडे यांनी बागल गटास सल्ला देताना असे म्हटले की बागल गटाने मकाई कारखाना भाडेतत्त्वावर द्यावा पण आदिनाथ कारखाना गहाण ठेऊ नये. आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याची काही गरज नव्हती व आपला या कृतीस विरोधच राहील, असा एकंदरीत त्यांच्या विधानांचा आशय होता.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनी आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेतला असून याची संपुर्ण प्रक्रिया पार पडली आहे.नुकतेच आमदार संजयमामा शिंदे यांनी दिल्ली येथे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आदिनाथ कारखाना हा बारामती ॲग्रोकडून चालवला जावा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे यानंतर स्वत: आमदार रोहित पवार यांनी आदिनाथ कारखाना हा लवकरच सुरु करणार असुन मी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला असल्याचे जाहीर करुन यात कोणी राजकारण करु नये असे आवाहन केले होते. बारामती ॲग्रो ची करमाळा तालुक्यातील धुरा संभाळणारे व पवार कुटुंबातील विश्वासु म्हणून ओळख असलेले सुभाष गुळवे हे देखील हा कारखाना पवारांनी सुरु करावा यासाठी प्रयत्नशील आहेत व आजमितीस गुळवे देखील संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत.
हे सर्वश्रुत असताना चंद्रकांत सरडे यांच्या वक्तव्यांने अनेक शंका उपस्थित होत असून चंद्रकांत सरडे यांचा बोलविता धनी कोण आहे ?याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहीत पवार यांच्यावर नुकतेच पक्षाने करमाळा विधानसभा मतदार संघासह पाच मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे मग आमदार संजयमामा शिंदे यांचाच आमदार रोहीत पवार यांना तर विरोध नसेल ना? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आपले कट्टर समर्थक चंद्रकांत सरडे यांना पुढे घालून आमदार संजयमामा शिंदे यांनी आता पवार कुटुंबास अडचणीत आणण्यासाठी हा डाव केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरी कडे चंद्रकांत सरडे हे जिल्हापरिषद पंचायत समीती निवडणुकीच्या अनुषंगानेच असे वक्तव्य करून बागल- पाटील युती झाली तर आपला मार्ग सुकर करत आहेत का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.रश्मी बागल यांनी आदिनाथ कारखान्याची सर्वसाधारण सभा घेऊन रितसर परवानगी घेऊन सभासदांना विश्वासात घेऊन आदिनाथ भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला, या गोष्टीला जवळपास दोन वर्षे उलटुनही गेली आहेत. मग आता हा विषय ऐरणीवर आणून चंद्रकांत सरडे काय सिद्ध करु पाहत आहेत. किंवा चंद्रकांत सरडे यांनाच खुद्द आमदार संजयमामा शिंदे यांना अडचणीत आणावयाचे आहे का ? याबाबत देखील सुलट चर्चा चालू आहे. मथ्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समितीत एका बैठकी दरम्यान संचालक चंद्रकांत सरडे व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी काही राजकीय चर्चा केली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे चंद्रकांत सरडे बागल गटाच्या संपर्कात असेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर सरडे यांनी सावरासावर करत मी आमदार शिंदे गटाचा कट्टर समर्थक असुन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी मी संजयमामा यांच्याच पाठीमागे भक्कमपणे उभे राहीन असे स्टेटमेंट दिले होते. या वेळी नेमके सरडे यांनी हे स्टेटमेंट दिले होते का? देण्यास भाग पाडले होते याबाबत देखील आजच्या वक्तव्यावरून शंका निर्माण होत आहे.जर सरडे हे आमदार संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक असतील तर आमदार संजयमामा शिंदे हेच आपल्या कमलाई या कारखान्याचे अस्तित्व टिकावे म्हणून चंद्रकांत सरडे यांना पुढे घालून आमदार रोहीत पवार यांना विरोध करत असल्याची चर्चा गावोगावी रंगु लागली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.