loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरड येथील कोठावळे परिवाराचा आगळा उपक्रम ऊसतोड मजुरांना मिष्टान्न देऊन शिवजयंती साजरी

उमरड येथील कोठावळे परिवाराने उसतोड मजुरांना मिष्टान्न देऊन शिवजयंती साजरी केली असुन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उमरड येथील कोठावळे परिवाराने शिवजयंतीचे औचित्य साधून बारामती ॲग्रो कारखान्याच्या ऊसतोड मुजरा सोबत शिवजयंती साजरी केली. टोळी मुकदम अण्णा मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या नंतर कोठावळे परिवाराकडून सर्व ऊसतोड मजुरांना मिष्ठान्न भोजन दिले. यावेळी टोळीतील आणिल अहिरे, पिंटू मोरे, कैलास मोरे, उत्तम सोनवणे ट्रॅक्‍टर ड्रायव्हर अमोल गाढवे, सर्व लेबर चाळीसगाव तालुक्यातील आहेत व ते उमरेड येथील संजय कोठावळे यांची शेतात ऊस तोडणी करता आले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उसतोड मजुरांना देखील शिवजयंती उत्सव साजरा करण्याची इच्छा असते परंतु आपला मुलुख सोडून बाहेर आल्याने त्यांना ते शक्य होत नाही म्हणून आज उसतोड मजुरांच्या हातुन शिव प्रतिमेजे पुजन करुण मिष्टान्न वाटप केल्याचे संजय कोठावळे यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts