loader
Breaking News
Breaking News
Foto

वीट येथील भैरवनाथ बहुद्देशीय संस्थेस भारत सरकारचा पुरस्कार

खेळ व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या मार्फत दिला जाणारा २०२०-२१ साठीचा उत्कृष्ठ संस्थेचा पुरस्कार भैरवनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वीट या संस्थेस मिळाला असून मा.जिल्हाधिकारी श्री.मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना काळात केलेल्या आर्सेनिक ३० गोळ्यांचे वाटप, कोरोना विषयी विशेष जनजागृती,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, युवक मेळावा यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार संस्थेला देण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

हा पुरस्कार संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय निंबाळकर यांनी मा.जिल्हाधिकारी व नेहरू युवा केंद्र संघटनेचे आभार मानले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संस्थेस मिळालेल्या या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts