loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा जामखेड रोडची(पोथरे हद्दी पासुन )दुरावस्था ' दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा माजी सभापती भाग्यश्रीताई खटके यांचा इशारा!

करमाळा जामखेड (पोथरे हद्दी पासुन ) पूर्णपणे खराब झाला खराब झाला आहे या कडे ठेकेदार व अधिकारी यांचे दुर्लक्ष असून दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती भाग्यश्रीताई खटके यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधिक बोलताना खटके म्हणाल्या आहेत की करमाळा जामखेड रोड (पोथरे हद्दी पासुन ) पूर्णपणे खराब झाला आहे .करमाळा व जामखेड जाणारे तसेच पोथरे व पंचक्रोशीतील हजारो प्रवासी या रस्त्यावरुन प्रवास करत असतात. दर शनिवारी पोथरे येथील शनीदेवाच्या दर्शनासाठी तालुक्यातुन शेकडो भाविक येत असतात. खराब झालेल्या या रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दुचाकीवरुन या रस्त्यावर प्रवास करणे आव्हान ठरत होते सध्या चारचाकी व शेतकऱ्यांना उसाचे ट्रकट्रर व ट्रक काढण्यासाठी दुसर्‍या ट्रकट्रर ची मदत घ्यावी लागत असल्याने अर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मध्यंतरीच्या काळात ठेकेदाराने डागडुजी करण्याऐवजी नुसती मलपट्टी केली असुन हि डागडुजी करताना कामाचा दर्जा राखला असता तर आज रस्त्याची दुर्दशा झाली नसती ठेकेदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करमाळा पंचायत समीतीच्या माजी सभापती भाग्यश्रीताई खटके यांनी केला असून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts