loader
Breaking News
Breaking News
Foto

पोंधवडी येथे रक्तदान करून शिवरायांना अभिवादन ५१ शिवभक्तांनी केले रक्तदान

शिवजयंतीचे औचित्य साधून पोंधवडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या वेळेस पोंधवडी येथील ५१ शिवभक्तांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे उद्धाटक पुणे हडपसर मगरपट्टा येथील युवा उद्योजक,युवा नेते,बिल्डर,सामाजीक कार्यकर्ते कमलेश(दादा)मगर यांच्या हस्ते करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या शिबीराचे आयोजन दादाश्री फाऊंडेशन वीट व समस्त ग्रामस्थ पोंधवडी यांच्या वतीने संयुक्तरीत्या करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते गणेश करे पाटील यांनी शिबीराला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रंचड मोठा वारकरी वारसा लाभलेल्या गावात पहिल्यांदाच शिबीर झाल्याने लहान पासुन थोरांना आनंद झाला एकुण ५१ जणानी रत्कदान केले उपस्थिताचे स्वागत दादाश्री फाऊडेशनचे सचीव काका काकडे यांनी तर आभार अमोल कोडलिंगे यांनी मानले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कार्यक्रमासाठी अमोल कोडलिंगे, प्रविण भिसे, सागर कोडलिंगे,अमोल भोजने, अजित साबळे, प्रशांत जगदाळे, किशोर मेढे, अप्पा हुलगे, राहुल राऊत, गोकुळ अनारसे,नाना क्षिरसागर, महादेव भिसे,नाना राऊत, सागर नवगिरे, अभिषेक भोरे, दत्ता गाड़े, आनंद खरात,नितीन राऊत सह अनेक ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते प्रथम रत्कदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts