loader
Breaking News
Breaking News
Foto

एकापाठोपाठ एक निवडणुका ,गट नेतृत्वांचा लागणार कस!

करमाळा तालुक्यात जिल्हा दुध संघाच्या माध्यमातून राजकीय धुळवड सुरु झाली असून, नगरपालीका, जिल्हापरिषद पंचायत समिती , आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकांने या मध्ये रंगत येणार आहे. तालुक्यातील गटातटाचे राजकारण लक्षात घेता तालुका पातळीवर प्रमुख नेतेमंडळींचा युत्या आघाड्या करण्यापासून, उमेदवार ठरवणे, बंडखोरांना थोपवणे याबाबत कस लागणार असून नेतेमंडळची चांगलीच डोके दुखी वाढणार आहे. याबाबत सा चौफेर चे पत्रकार शंभुराजे फरतडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालूक्यात आगामी काही आठवड्यात निवडणुकांचे सत्र सुरू होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती, करमाळा नगरपालिका, आदिनाथ सहकारी साखर कारखाना या निवडणुका एकापाठोपाठ एक अशा येत असून रणधुमाळी सुरु झाली आहे. वास्तविक पाहता करमाळा तालूक्यात गटातटास प्राधान्य देऊन निवडणुकांची रणनिती आखली जाते. यामुळे जो तो गट आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार हे तर उघडच आहे. परंतु करमाळा तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ते अथवा सहकारी गटांच्या युती आघाडी यामध्ये बदल होतातच हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आजवर मागील निवडणुकीतील गटांची समिकरणे पुढील निवडणुकीत तशीच स्थिर आणि कायम राहीली आहेत असे एकही उदाहरण शोधुनही सापडणार नाही. यामुळे मग पाटील गट, बागल गट, शिंदे गट व जगताप गट या गटांसह मोहिते-पाटील गट,नागरी संघटना, सावंत गट, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, काँग्रेस, आरपीआय, प्रहार संघटना, बहुजन संघर्ष सेना, अतुल खुपसे यांची जनशक्ती संघटना ,शिवप्रताप युवा प्रतिष्ठान, आदि गट व संघटना तसेच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार उभे करणार.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

खरी कसोटी ही तालूक्याचे व पर्यायाने करमाळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख नेतृत्वांची आहे. यामुळे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांना आगामी निवडणुकांमध्ये आपल्या गटास विजय मिळवून देणारी समिकरणे मांडताना कसरत करावी लागणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांना जगताप, सावंत व देवी यांना बरोबर घ्यावयाचे तर आहेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही विचार करावा लागणार आहे.दुसरीकडे नारायण पाटील व रश्मी बागल यांना सहकारी गट तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांचा मेळ घालून निवडणुकीची रणनिती तयार करावी लागेल. आमदार शिंदे यांना जगताप व सावंत गट यांना करमाळा नगरपालिका निवडणुकीत एकत्र आणणे सध्यातरी फार अवघड जाणार आहे असे वाटले तरी राजकारणात काही अशक्य नसते.तर बागल व पाटील यांच्यापैकी शिवसेना पक्षाची सुत्रे कोणाकडे राहणार की दोघेही शिवसेना पक्षाचा केवळ वापर करुन घेणार या प्रश्नाची उत्तरे निवडणुकीच्या अगोदरच मिळणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत बागल गट हा शिवसेनेच्या बाणावर निवडणुक लढवणार असेल तर मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत सुध्दा बाण हेच चिन्ह असणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे मोहिते-पाटील गट हा तालुक्यात मर्यादित असला तरी जिप व पंस निवडणूक आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा ठरणार असल्याने या गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी पाटील व बागल हे दोन्ही गट प्रयत्नाशील आहेत. आतापर्यंत तरी नारायण पाटील व मोहिते-पाटील यांचे सुत चांगलेच जुळले असल्याने यात बदल होईल असे वाटत नसताना बागल व मोहिते-पाटील यांच्यातील जवळीक वाढू लागल्याने आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका असणार याबद्दल अंदाज बांधणे कठीण झाले आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा हा महत्वाचा पक्ष ठरणार असला तरी शहर भाजपा व ग्रामीण भाजपा असे वर्गीकरण झाल्याने मुळ भाजपात फुट पडेल की काय अशी शंका उपस्थित होते. परंतू भाजपा हा केडर बेस वर काम करणारा पक्ष असल्याने निवडणुकीपूर्वी सर्व मतभेद दुर होणार हे हि तितकेच उघड आहे.शिवसेना पदाधिकारी हे नगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार हे जरी खरे असले तरी बागल गट उमेदवारी देताना शिवसेना पदाधिकारी यांचा कितपत विचार करेल यावरच शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे.आदिनाथ कारखाना निवडणुक होण्यापुर्वी करमाळा नगरपालिका व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या असतील. यामुळे या निवडणुकीतील जय पराजय हा गटांची समिकरणे बदलून टाकणार हे निश्चित मानले जात असून या सर्व निवडणुका म्हणजे सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीची पुर्व तयारी करणाऱ्या आहेत. यामुळे प्रमुख नेत्यांची खरी कसोटी हि निवडणुकीतील समीकरणे टिकवुन ठेवण्यात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts