loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार संजयमामा शिंदे यांचा "आमदार आपल्या दारी " उपक्रम पुन्हा सुरु .या गावातुन होणार सुरुवात

करमाळा माढा विधान सभेचे आमदार संजयमामा शिंदे यांनी "आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!"हा उपक्रम सुरु केला होता .या कार्यक्रमास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत होता .या संकल्पनेसाठी आमदार शिंदे गटाचे समर्थक सुजित तात्या बागल यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान मध्यंतरी कोरोना मुळे हि योजना बंद होती. हि योजना बंद झाल्यावरुन पाटील शिंदे गटात चांगलाच सामना रंगला होता .या मध्ये सुजित तात्या बागल व पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांच्यात एकमेकांवर शाब्दिक वार पलटवार झाले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या पार्श्वभूमीवर पुन्हा विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येतील. तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येईल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी सोमवार दि. 21/02/ 2022 रोजी सकाळी 9 .30 ते 5.3उपस्थित राहावे.सदर शिबिर स्थळ - जि. प. प्रा. शाळा चिखलठाण नं.1 .येथे होणार असून या मध्ये सहभागी गावे- चिखलठाण नं. 1,2 ,केडगाव , कुगाव, सोगाव पूर्व-पश्चिम, गोयेगाव, उंदरगाव, 1,2 ,वाशिंबे , मांजरगाव व रिटेवाडी , शेटफळ.असणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts