मुदतीत काम न झाल्याने कोर्टी ते आवाटी रखडलेल्या रस्त्यासाठी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांनी धरणे आंदोलन केले. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ताब्यात घेतले. आणि वेळेत व मुदतीत काम न झाल्यामुळे संबंधित विभागाने एन.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दणका दिला असून प्रति दिवस ८.५ लाखा प्रमाणे पाच महिन्यांसाठी १२ कोटी ७५ लाख रु..दंड केला असून यापुढे देखील काम पुर्ण होईपर्यंत प्रतिदवस उदंड लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोर्टि ते आवाटी रस्त्यासाठी जनशक्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार धरणे आंदोलन न करता जनशक्ती ने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ताब्यात घेतले. इकडे अतुल खुपसे कार्यालयात आल्याचे लक्षात येताच एकच धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी एकत्रित येऊन सोबत चर्चा करण्याचे ठरले.
चर्चेअंती वेळेत काम न झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र अधिकारी ने दिले तर रस्ता सुरू असल्याने दोन्ही बाजुने धुळीचे प्रचंड लोट उडत आहेत.यासाठी रोज पाणी मारण्याचे १२ टँकर देण्याचे ठरले आणि काम त्वरित चालू करणार असल्याचे आश्वासन अधिकारी व ठेकेदाराने दिले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.