loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढेज ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच बदलाच्या हालचाली, कोणाला संधी मिळणार या कडे पंचक्रोशीचे लक्ष

कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच बदलाचे संकेत मिळाले असून लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांना या पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. कोंढेज ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाची सत्ता असुन पुर्ण बहुमत प्राप्त आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2017 ते 2021 पर्यंतही पाटील गटाचीच सत्ता या ग्रामपंचायतीवर होती. सन 2021 च्या निवडणुकीत आमदार शिंदे व माजी आमदार बागल तसेच जगताप या तिन्ही गटांचा पराभव करत पाटील गटाने विजयी परंपरा कायम राखली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यानंतर 2021 ला पाटील गटाकडून सरपंच म्हणुन सौ छाया कांतीलाल राऊत व उपसरपंच म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सदस्य शहाजी नाना राऊत यांना संधी देण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उरकला असुन सरपंच व उपसरपंच बदलाचे संकेत पाटील गटाकडून मिळाले असून आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत सदस्या सौ अश्विनी गणेश सव्वाशे, गोविंद नाना लोंढे, सौ दाळुबाई हनूमंत बादल व सौ सविता जालिंदर आदलिंग या चौघापैकी कोणत्या दोन सदस्यांना पुढील टर्मसाठी संधी मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोंढेज ग्रामपंचायतीवर पाटील गटाची सत्ता आल्यापासुन गावाचा विकास झपाट्याने होत असून गावात पिण्याचे पाणी, बंदिस्त गटार, गाव अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, हायमास्ट दिवे, स्मशानभुमी सुधारणा, कोष्टी समाजासाठी दफनभुमीचे निर्माण, शाळा,आरोग्यकेंद्र व अंगणवाड्या यांना विविध सुविधा देणे, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसर विकास, श्री महादेव मंदिर सभामंडप निर्माण आदि विकासकामे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार निधी तसेच विविध निधी प्राप्त करून करण्यात आली आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आता पुढील कालावधीसाठी सरपंच व उपसरपंच या पदासाठी पाटील गटाकडून प्रत्येक सदस्य इच्छुक असल्याने कोणाला संधी मिळणार हे लवकरच समजणार आहे. कोंढेज येथील पाटील गटाचे आबासाहेब गायकवाड,गणेश सालसकर, माजी सरपंच नागनाथ आदलिंग, माजी सरपंच दादासाहेब लोंढे-पाटील,मधूकर साबळे, बाळासाहेब राऊत, रमेश उंबरे, निवास सालसकर,बापुसाहेब आदलिंग महादेव लोंढे, बापुलाला आदलिंग, सोसायटी माजी सदस्य संजय लोंढे, श्रीनिवास महामुनी, चंदुशेठ बोराडे, संतोष माने,भागवत लोंढे, इकबालभाई शेख, बबन माने, जालिंदर माने,रामभाऊ राऊत, बंडोपंत आदलिंग आदिसह पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची लवकरच बैठक होणार असुन निवडीबाबत चर्चा होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts