उद्धव ठाकरेंच्या 'त्या ' वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ! ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्धव ठाकरेंच्या 'त्या ' वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी तोलुन मापुन बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात कधी उथळपना नसतो. ते सहसा खोचक पणे टिका टिप्पणी करण्याचे टाळतात पंरतु मार्मिक च्या वर्धापन दिना निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळुन निघाले असुन राजकीय विश्लेषक आप-आपल्या परीने अर्थ काढत आहेत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'मार्मिक'च्या हिरक महोत्सवानिमित्त त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 'मार्मिक' या नियतकालिकास ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका ऑनलाइन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे शिवसैनिकांशी व महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीसोबतचे संबंध, सरकार पाडण्याबद्दल भाजपा नेत्यांकडून केली जाणारी विधानं याची किनार मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला लागलेली दिसुन आली. "एरवी आपण मेळाव्यात भेटतो तेव्हा तुम्ही सारे समोर असता. आज या ऑनलाइन मेळाव्यात सोबत आहात, पण दिसत नाहीत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक विधान ठाकरेंनी केलं.

अन्यायाविरोधात लढणे हाच मराठी बाणा आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढाई सुरू केली, तेव्हा हरण्या-जिंकण्याची फिकीर केली नव्हती. तोच शिवसेनेचा विचार आहे. जिंकणार की हरणार याचा विचार न करता लढणार व अन्याय करणाऱ्याला ठेचणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसैनिकांच्या सोबतीविना सेनापतीला अर्थ नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

- मुंबई प्रतिनिधी -वैभव फरतडे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts