आमदार संजयमामा शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली भेटीवरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना आज पाटील गटाकडून पुन्हा एखदा या भेटीवरुन आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी निशाणा साधला आहे. आमदार शिंदे यांचे आदिनाथ वरील प्रेम म्हणजे पुतणा मावशीचा पान्हा असल्याचे सांगत आदिनाथच्या उमेदवारीचा व चेअरमन व्हा चेअरमन पदाचा शब्द देऊन जिल्हापरिषद पंचायत समिती निवणुक पार पाडण्याचा आमदार शिंदे यांचा डाव असल्याचा हल्लाबोल तळेकर यांनी केला आहे. तळेकर यांनी म्हटले आहे की शिंदे गटात फुट पडू नये म्हणूनच आदिनाथ कारखान्याचे गाजर दाखवण्याचा आमदार संजयमामा शिंदे यांचा डाव असून .या भेटीचे कारण हे केवळ राजकारणच आहे असा आरोप करत आ. शिंदे गटास घेरण्याचा प्रयत्न प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
हि भेट केवळ विकासकामांसाठीच होती असे आमदार संजयमामा शिंदे ठामपणे सांगत असले तरी आज माजी आमदार नारायण पाटील गटाकडून याबाबत सविस्तर बोलताना आ. संजयमामा शिंदे यांची 'कही पे निगाना कही पे निशाना' अशी भुमिका असुन आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूकीत आमदार शिंदे गट व सहकारी गट एकसंघ रहावेत म्हणून त्यांनी आदिनाथ कारखान्याचा विषय स्वतः हुन प्रकाशात आणला आहे असे म्हणत, गेली दोन वर्षे आदिनाथ बद्दल ब्र शब्दही न काढणारे आ संजयमामा शिंदे आज आदिनाथ बद्दल एवढी आस्था का दाखवत आहे हे न कळण्याइतपत करमाळा तालुक्यातील जनता खुळी नाही असे म्हटले आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांना आगामी निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार आहे याची धास्ती आतापासूनच वाटायला लागली आहे. मुळ आ शिंदे गटात बहुतांश नेतेमंडळी हि सहकार क्षेत्रातील असुन अनेक वर्षे पराभूत होत आलेली अशीच आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत हि मंडळी निवडून येऊ शकत नाहीत. याशिवाय करमाळा तालुक्यातील सत्तेतील वाटा दिल्याशिवाय सहकारी गट सुध्दा भविष्यात आपल्या जवळ राहणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने आता आदिनाथ कारखान्याचा विषय ऐरणीवर आणून आगामी काळात आदिनाथ कारखान्यावर आपली सत्ता येईल असे सांगून आतापासूनच आदिनाथच्या उमेदवारीचा व वेळ पडलीच तर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाचा शब्द अनेकांना देऊन जि प तसेच पं स निवडणूक पार पाडायची असा आमदार संजयमामा शिंदे यांचा डाव आहे. यामुळेच त्यांनी आतापासुन आदिनाथ निवडणुकीचे चित्र रंगविण्यास हाती घेतले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुर्ण क्षमतेने चालवला गेला तर याचा फटका आ शिंदे यांच्या श्री कमलाई कारखान्यास बसणार हे निश्चित असल्याने आमदार संजयमामा शिंदे यांचे आदिनाथ बद्दलचे प्रेम म्हणजे पुतणामावशीचा पान्हा असेच आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.