loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन 18 फेब्रुवारी पासून होणार सुरु! आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती.

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन 2 फेब्रुवारी पासून सुरू करायचे होते . परंतु लोकांची मागणी नसल्यामुळे, तसेच आवर्तन सुरु झाल्यानंतर येणाऱ्या अडचणीमुळे आवर्तन तात्पुरते पुढे ढकलावे अशी आग्रही मागणी शेतकरीवर्ग मधून होत होती. त्यांच्या विनंतीनुसार तात्पुरते स्थगित केलेले आवर्तन 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजनेचा मुख्य कॅनॉल 27 किमी लांबीचा आहे. कॅनॉलला पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यास कॅनॉल पाझरून बाजूच्या शेतामध्ये पाणी जाण्याचा व त्यामुळे ऊस तोडणीला अडचण येण्याची शक्यता होती त्यामुळे आवर्तन स्थगित केले होते. आजही कॅनॉलच्या भोवतीचे संपूर्णपणे ऊस तुटलेले नाहीत त्यामुळे सुरुवातीला कमी दाबाने योजना चालवण्याचे नियोजन आहे .त्यामुळे पाणी पाझरण्याची शक्यता कमी आहे. सदर आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालणार असून शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे हे आवर्तन 18 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन 18 फेब्रुवारी पासून सुरू करण्याची सर्व तयारी जल विद्युत विभाग, यांत्रिक विभाग तसेच स्थापत्य विभागाने केलेली आहे. सदर रब्बी व उन्हाळी आवर्तन हे सलग घेण्याचे नियोजन असल्यामुळे 18 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आवर्तन अखंडितपणे सुरू राहील. त्यामुळे योजनेतील सर्व गावांना त्यांच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात पुरेसे पाणी मिळेल पाण्याची कोणीही चिंता करू नये असे आवाहन उपअभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12-चे एस. के. अवताडे यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दहिगाव आवर्तन सुरु होत असल्याने पुर्व भागातील शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आमदार संजय मामा शिंदे यांचे कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts