loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या पत्रकार परिषदे कडे राज्याचे लक्ष! "ते साडे तीन " कोण ? चर्चेला उधाण

आज चार वाजता होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदे कडे राज्याचे लक्ष असुन संजय राऊत व शिवसेनेच्या निशाण्यावर असलेले "ते साडे तीन " कोण ? या चर्चेला उधाण आले आहे.शिवसेना नेते संजय राऊत व भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोमय्या यांनी शिवसेनेला डिवचण्यास सुरवात केली असुन शिवसेना व संजय राऊत यांना लक्ष केले आहे. संजय राऊत हे ऐकटे पडले असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारील जेलची खोली सॅनीटायज करुन ठेवली असून संजय राऊत यांना वाईन फॅक्टरी भागीदरी प्रकरणात जेलची हावा खावीच लागणार आहे .असे सोमय्या वारवंवार सांगत असुन आणख काही नेते देखील जेल मध्ये दिसतील असे सोमय्या यांनी म्हटले आहे.दरम्यान अशिष शेलार देखील शिवसेनेवर तुटून पडले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप काँग्रेस व राष्ट्रवादीत फारसे वाकयुध्द होताना दिसत नाही तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी कडुन देखील भाजपावर टिका होताना दिसुन येत नाही. सरकार म्हणून तिन्ही पक्षाने उत्तर देणे गरजेचे असताना शिवसेनाच उत्तर देताना दिसत आहे.

वैभवराजे फरतडे ( मुंबई प्रतिनिधी

संजय राऊत एकटे पडले आहेत असे भाजपा कडुन डिवचले गेल्यानंतर संजय राऊत यांनी अक्रमक पावित्रा घेतला असून "आमचे देखील राज्यात सरकार आहे आणी त्या सरकारचे नेतृत्वशिवसेना करत आहे असा सुचक इशारा दिला आहे..सरकार सरकार असते बघु कोणात किती दम आहे" असे म्हणुन भाजपाला चॅलेंज केले असुन आम्हाला जेल मध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत मात्र भाजापाचे 'साडे तिन लोक जेल मध्ये जातील व अनिल देशमुख बाहेर' असतील असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे .तसेच मि कोणालाही घाबरत नाही. 'जो उखाडणा है व उखाडो'. असा इशाराच दिला आहे. दरम्यान आज शिवसेनेची होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्यासह देशातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार मंत्री,पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे देखील या पत्रकार परिषदेवर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळेच संजय राऊत व शिवसेना नेमकी काय भुमिका मांडणार आहे.?कोणती खळबळ माजवणार आहे ?.भाजपाचे ते साडेतीन नेते कोण ? असे प्रश्न उपस्थित झाले असून या पत्रकार परिषदेकडे भाजपा,शिवसेना,काँग्रेस राष्ट्रवादी सह सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले असुन आज चार वाजता शिवसेना भवनात हि पत्रकार परिषद होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts