loader
Breaking News
Breaking News
Foto

विट येथील युवा उद्योजक दिंगबर चोपडे युवकांच्या आग्रहास्तव उतरणार जिल्हापरिषद निवडणूकीच्या आखाड्यात

जिल्हा परिषद २०२२ च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.जि.प. वीट गटातुन अनेक जण इच्छूक आहेत त्यात एणखी एक युवा चेहऱ्याची भर पडली आहे .विट येथील युवा उद्योजक दिंगबर चोपडे हे युवकांच्या आग्रहास्तव जिल्हापरिषद निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार असुन वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दिंगबर चोपडे यांचा विट व परिसरात दांडगा मित्र परिवार असून त्यांची युवकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. जंगदबा अर्थमुव्हर्स च्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे .भविष्यात विट परिसरात कृषी पुरक उद्योग उभा करणार असल्याचा त्यांचा मानस आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दिंगबर चोपडे हे सध्या कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्यांचे सक्रिय कार्यकर्ते नसले तरी सर्व गटाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सर्वांशी विचारविनिमय करून कोणत्या गटाकडून उमेदवारी घेयची याचा निर्णय घेणार असून वेळ पडल्यास युवकांच्ये आग्रहास्तव अपक्ष देखील लढु असे त्यांनी नमूद केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विट जिल्हापरिषद अथवा पंचायत समिती गणातून चोपडे यांची उमेदवारी असल्यास ते तगडे आव्हान निर्माण करतील असे बोलले जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts