loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटिल गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांची पुन्हा आमदार शिंदे यांच्यावर सडकून टिका, सुजित बागल यांचा देखील घेतला समाचार

दोन वर्षाचा कालावधी उरकला तरी फक्त कागदी घोड्यांचाच नाच पहायला मिळतोय, प्रत्यक्षात विकासकामांचे आमदार महोदयांना वावडे असावे, असा हल्लाबोल आज माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आ. शिंदे यांच्या दिल्लीवारी वरुन करण्यात आला. आहे तसेच काल सुजित बागल यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना तळेकर यांनी सुजित बागल यांना टोला लागवला असून तालूका सार्वजनिक ग्रंथालय समितीचे तालुकाध्यक्ष हे पद मात्र स्वयंघौषितच होते का? आणि सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हासमिती मधून आपली हकालपट्टी का झाली हे माझ्यावर टिका करणाऱ्यांनी स्पष्ट करुन सांगावे असे म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधिक बोलताना प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की दहिगाव उपसा सिंचन योजना सुप्रमा, जातेगाव-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग, मांगी तलावातील पाणी एम आय डी सी साठी उपलब्ध करुन देणार, कुकडीचा पाणीसाठा वाढवून घेणार आदि सर्व कामे फक्त कागदावरच ठळकपणे दिसत आहेत. दोन वर्षाच्या कालावधीत आमदार स्थानिक विकासनिधीतुन केलेल्या कामां व्यतिरिक्त अन्य एक तरी काम प्रत्यक्षात झालेले पहावयास मिळणार नाही. तरीही विकसनशील नेतृत्व म्हणून आ. शिंदे यांची प्रतिमा गडद करण्याचा मुळ शिंदे गटाचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेची आवर्तने हा तर निव्वळ आयत्या पीठावर रेघा मारण्याचा प्रयत्न असुन आ. शिंदे यांच्या कालावधीत मुख्य चारी व उपचारीची किती कामे झाली ? मुख्य चारीचे अस्तरीकरण झाले का? दोन वर्षात किती किलोमीटर नवीन रस्त्यांची कामे झाली? या प्रश्नावर आमदार महोदयांनी आपला लेखाजोखा मांडावा. महावितरणकडून सध्या वीजेची कामे चालू आहेत. हि सर्व कामे शेतकऱ्यांच्या कडुन केलेल्या वीजबिल वसुलीतुन चालू असुन याच्या मंजूरी व नीधी खर्चाचे थेट अधिकार महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. या कामांचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करु पाहत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आमदार महोदयांनी दिल्लीवारी करुद्यात अथवा व्हाईट हाऊसमध्ये जाऊन वॉशिंग्टन वारी करुद्यात, याचे जनतेस देणेघेणे नाही.परंतू जर खरेंच या दौऱ्यात करमाळा मतदार संघातील विकासकामांबाबत नियोजन, मागण्या समाविष्ट असतील तर पत्रकारांना असे अंदाज बांधून अथवा स्वतः संपर्क साधून वृत्त प्रसिद्ध करण्याची वेळ आली नसती. "आमदार आपल्या दारी" हा उपक्रम कोरोनामुळे थांबला गेलाय हे आज जाहीर करण्याची वेळ आ. शिंदे गटावर आली आहे. कोरोना कालावधीतही उजनी जलाशयातील पर्यटनाचा आनंद घेत असतानाची आमदार महोदयांची छायाचित्रे करमाळा मतदार संघातील तमाम जनतेने पाहीली आहेत. यामुळे कोरोनाबाबत कोण किती गंभीर आहे हे अधिक सांगणे ठिक नाही. लोकशाही मार्गाने आम्ही प्रश्न विचारला तर वैयक्तिक टिका करुन मुळ प्रश्नास बगल दिली जाते.अलिबाबाच्या या टोळीतील काहीजण माझ्यावर टिका करत असताना स्वतः चा पुर्व इतिहास झाकुन ठेवत आहेत. सार्वजनिक ग्रंथालयाना मान्यता मिळवून देतो, वाचनालयास अ ब क ड दर्जा मिळवून देतो असे खोटे सांगून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून मेवा गोळा करणाऱ्यांना माझ्यावर टिका करण्याचा अधिकार नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पाटील गटाचे प्रवक्तेपद हे स्वयंघोषित नसुन माजी आमदार नारायण पाटील यांचे मला पाठबळ असल्याने सत्तर हजार नागरिकांची भुमिका मी मांडत आहे. परंतू करमाळा तालूका सार्वजनिक ग्रंथालय समितीचे तालुकाध्यक्ष हे पद मात्र स्वयंघौषितच होते का आणि सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हासमिती मधून आपली हकालपट्टी का झाली हे माझ्यावर टिका करणाऱ्यांनी स्पष्ट करुन सांगावे. आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकां मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या मुळ गटाचा एकही कार्यकर्ता विजयी होणार नाही.त्यामुळे संजयनिष्ठा दाखवून माझ्यावर वैयक्तीक टिका करणे विरोधकांनी थांबवावे. पाटील गट असल्या टिकेस फारसे गंभीरतेने घेत नाही.असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts