करमाळा तालुक्यातील विक्रमसिंह शिंदे चेअरमन असलेल्या ( कमलाभवानी काररखाना) कमलाई शुगर या साखर कारखान्याकडुन बिड गेवराई या बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उस गाळपास आणला जात आहे जाणीव पूर्वक करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून यात मोठे अर्थीक गौडबंगाल असल्याचा आरोप ग्राहक पंचायत समितीतीचे तालुकाध्यक्ष अॅड शशिकांत नरुटे यांनी केला आहे. या बाबत साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
या बाबत अधीक बोलताना नरुटे म्हणाले की बिड गेवराई जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आठराशे रुपयाने उस खरेदी केला जात आहे व तसे शेतकऱ्यांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले जात आहेत. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचा उस जाणीव पूर्वक गाळपास उशीरा आणायचा व उस वाळत असल्याने "वजन कमी व जादा रिकव्हरी" या द्वारे दुहेरी फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.साखर कारखान्यासाठी परवानगी देताना कारखाना कार्यक्षेत्र व लाभ परिसरातील उसाच्या नोंदी वरुन दिला जातो. मात्र लाभक्षेत्रातीलच उस गाळपास जात नसेल तर कारखाना चालवणार्यांचे स्वतःच्या स्वार्थासाठीचे हे गैरकृत्य असून हा गंभीर प्रकार तहसीलदार ,जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगतीले आहे. तसेच २६५ उसाची नोंद नोव्हेंबर २०२१ पर्यंत घेण्याचे आदेश असताना संबंधित शेतकर्यांचा उस गाळपास का गेला नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण असे देखील त्यांनी म्हटले आहे.
कमलाई कारखाना शेतकऱ्यांना मदत करेल या अपेक्षेने आम्ही त्यांच्या दुर्गंधी युक्त मळिचे पाणी पित आहोत, धुळीचे त्रासदायक परिणाम सहन करत आहोत कारखान्याकडुन उस मात्र बाहेर जिल्ह्यातील गाळपास आणला जात आहे. तालुक्यातील पुर्व हांगामी व आडसाली उसाची गाळपाची मुदत संपली आहे, कारखान्या हाकेच्या अंतरावर असलेला उस देखील गाळपाच्या प्रतिक्षेत आहे,बाहेर जिल्ह्यातील उस गाळपास येत असल्याने कारखान्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील उस गाळपाच्या प्रतिक्षेत आहे दुर्दैव असल्याचे देखील नरुटे यांनी म्हटले आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.