कोरोना नियमांमुळे आमदार आपले दारी उपक्रम काही काळापुरता पुढे ढकलला आहे. परंतु कामे मात्र आ. संजयमामा शिंदे यांचेकडून अव्याहतपणे सुरू आहेत ती आपल्याला दिसत व समजत नाहीत हा आपला वैचारीक दृष्टीदोष आहे . रावगाव येथील आमदार आपले दारी हा उपक्रम यशस्वी झाला व तद्नंतर ओमायक्रान चे संकट आले मुळे शासनाने कोरोनाचे निर्बंध लादले . त्यामुळे निर्बंधांचे पालन करणेसाठी जातेगाव येथील नियोजीत कार्यक्रम स्थगीत केला गेला होता. आता कोरोनाचे निर्बंध कमी होत असून लवकरच हा उपक्रम आम्ही जनसुविधेसाठी यशस्वीपणे संपूर्ण मतदारसंघात पार पाडू . आपण टीका करीत रहा लोकशाहीत विरोधकांचे हे कामच आहे . मामा आमदार आहेत ते त्यांचे कामे कर्तव्य निष्ठेने दिल्ली - मुंबई वारी करत पार पाडत आहेत . जनता त्यांच्या कामावर खुष आहे, २ वर्षाने का होईना आपण विरोधकांच्या भूमिकेत येवून माजी आमदार आहात हे स्विकारताय हाच मामांच्या विकास कामांचा विजय आहे. असे मत संजयमामा शिंदे मोटार वाहतुक संस्थेचे चेअरमन सुजीत तात्या बागल यांनी व्यक्त केले आहे .
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ,काम होण्याअगोदरच निवेदन देवून फोटो काढून जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपले आहेत याचे भान विरोधकांनी ठेवावे . संजयमामा शिंदे यांनी आमदार झालेपासून मतदार संघातील पाणी, आरोग्य, वीज, डिकसळ पूल, भुसंपादन मोबदला, रस्ते आदी कामांचा जो सपाटा लावला आहे यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून राजकीय भवितव्याच्या चिंतेने ते ग्रासले आहेत त्यामुळे नैराश्येतून ते वारंवार आ .शिंदे यांचेवर टीका करत आहेत .
आ .शिंदे यांचे शासन दरबारी असलेले वजन, प्रशासनावरील वचक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भक्कम पाठबळ व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या खंबीर साथीमुळे आ . शिंदे यांचा विकास कामांचा अश्वमेध सुसाट धावत आहे. यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत व आपली राजकीय दुकानदारी कायम स्वरूपी बंद होईल कि काय? या भीतीपोटी व आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही प्रसिध्दीची अयशस्वी स्टंटबाजी असल्याचे मत देखील सुजीत बागल यांनी व्यक्त केले आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.