loader
Breaking News
Breaking News
Foto

"दिल्ली वारी" दुर ठेवा, अगोदर "आमदार आपल्या दारी" संकल्पनेचं काय झालं ते सांगा ? सुनील तळेकर यांचा आमदार शिंदे यांना सवाल

आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील या दोन गटांत सुरु असलेले वाकयुध्द आरोप-प्रत्यारोप व टिका-टिप्पणी ने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .या ना त्या कारणावरून या दोन गटांत सतत शाब्दिक संघर्ष सुरु आहे. आज आमदार संजय मामा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील विकासकामांवर चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी निषाणा साधत.आगोदर आमदार आपल्या दारी संकल्पनेचे काय झाले असा सांगा म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

"दिल्ली वारी" दुर ठेवा, अगोदर "आमदार आपल्या दारी" संकल्पनेचं काय झालं ते सांगा ? असा सवाल पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला असून शेतकऱ्यांच्या नजरेला नजर देऊन बोलायला जी नैतिकता लागते ती नैतिकता आ. संजयमामा शिंदे यांच्या कडे नसल्याचा सणसणीत टोला त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे लगावला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आमदार संजयमामा शिंदे यांनी नुकताच "दिल्ली दौरा" करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले त्यावर पाटील गटाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत अधिक बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 2014 ते 2019 मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली. तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी आठवड्यातील तीन दिवस मुंबईतील मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी दिले व उर्वरित चार दिवस मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकुन घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी दिले. यामुळेच रस्ते, सिंचन, वीज, आरोग्य व कृषी विभागातील कामे मार्गी लागली. परंतु 2019 मध्ये मात्र विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील 115 गावासाठी आठवड्यातील एक दिवस देत आहेत त्यातही कधी नियमितता दाखवली नाही असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आ. संजयमामा शिंदे यांनी ढोल नगारे वाजवत "आमदार आपल्या दारी" या त्यांच्या संकल्पनेची घोषणा स्वतः पत्रकार परिषदेत एका मुलाखतीत केली.यावेळी त्यांनी राज्यातील इतर आमदार महोदयांचा नामोल्लेख करत आपण त्यांच्या सारखीच हि संकल्पना आपल्या करमाळा तालूक्यातही राबवत असल्याचे सांगून यातुन लोकांचे प्रश्न त्यांच्या गावात जाऊन मार्गी लावणार असल्याचे सांगितले.परंतू प्रत्यक्षात मात्र एकाच कार्यक्रमा नंतर हा संकल्प बासनात गुंडाळून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. कदाचित गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली विकास कामे, जनतेस दिलेली पोकळ आश्वासने, वीज बिल वसुली मोहिमेच्या वेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे, शेतकर्‍यांच्या कागदपत्रांचा वापर करत श्री विठ्ठल कार्पोरेशन या म्हैसगाव येथील आपल्या कारखान्यासाठी कर्ज मिळावे म्हणून विनासंमती याचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कर्जे काढणे या सर्व गोष्टींमुळेच आमदार शिंदे यांना आपला 'आमदार आपल्या दारी' हा संकल्प गुंडाळून ठेवावा लागला. आगामी काळात जरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक प्रचारासाठी आ. शिंदे यांनी गावभेट दौरा केला तरी जनता वरील प्रश्नांची उत्तरे मागणारच आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्यानावे बोगस कर्ज प्रकरणाबाबत आमदार संजय मामा शिंदे हे आपले मौन सोडुन याबाबत खुलासा करत नाहीत तो पर्यंत पाटील गटाकडून हा प्रश्न उपस्थित केला जाईल. कारण आजमितीसही करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जापायी विविध बँकेच्या नोटीसा येत असून आता तर चक्क टेंभुर्णी येथील आयडीबीआय बँकेने याबाबत शेतकऱ्यास नोटीस पाठवली आहे. त्यात 2 लाख 69 हजार 461 रुपये कर्जाचा उल्लेख आहे. डिसेंबर महिन्यात आलेली हि नोटीस असुन कर्ज थकल्याने 26 हजार 784 रुपये एकुण व्याज भरावे लागणार आहे. सदर कर्ज मागणीसाठी आवाटी येथील शेतकऱ्याने आयडीबीआय बँकेकडे कधीच मागणी सुध्दा केली नसुन या कर्जाबाबत त्याला कसलीही माहिती नव्हती.आता थेट नोटीस आल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. हि बोगस कर्ज मालिका कधी थांबणार? असा सवाल विचारला आहे. दिल्ली मुंबई व पुणे दौरे करुन करमाळा मतदार संघातील मुळ प्रश्नाला बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा हा सारा प्रकार असल्याचे पाटील गटाकडून सांगण्यात आले.मी एक सामान्य नागरिक असुन माझ्या मतदार संघाचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार सार्वभौम लोकशाहीने दिला आहे. परंतू मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता माझ्यावरचं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आ. शिंदे गट टिका करत आला आहे. पण मी या टिकेस घाबरुन प्रश्न विचारणे बंद करणार नसल्याचे देखील तळेकर ठामपणे सांगितले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts