जातेगाव टेंभूर्णी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोके चा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यची सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेऊन तात्काळ काम सुरु केले होते. खड्डे बुजवण्याचे काम मध्येच थांबणार नाही तसेच कामाचा दर्जा देखील उत्कृष्ट ठेवू असे अधिकाऱ्यांकडून लेखी दिल्याने सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन स्थगित केले असल्याचे सर्वपक्षीय समितीने कळवले आहे
अहमदनगर टेंभुर्णी राज्यमार्गावरील जातेगाव ते कंदर दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्था दूर करून तात्काळ खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पद्मसिंह पाटील विद्यालय येथे होणारे रस्ता रोको आंदोलन होणार होते मात्र ,रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाल्याने प्रत्यक्ष पाहणी केल्याने रास्ता रोको तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी या आंदोलनाची नोटीस सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना दिली होती. यामध्ये दिनांक 13 फेब्रुवारी पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
काल दिनांक 10 तारखेपासून या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे आज दिनांक 12 रोजी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पांगरेभाळवणी सीमेवर प्रत्यक्ष काम सुरु असल्याची पाहणी केली. त्यामुळे या आंदोलनाच्या पवित्र्याला यश आल्याने या कार्यकर्त्यांना बांधकाम उपअभियंता मा.उबाळे साहेब यांनी भेटीस बोलावले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. चर्चा केली. चर्चेदरम्यान श्री उबाळे यांनी दुरुस्तीचे सुरू केलेले हे काम जलद गतीने चालू ठेवण्यात येईल हे काम मध्यंतरी थांबवणार नाही. कामाचा दर्जा देखील उत्कृष्ट ठेवू अशा प्रकारचे आश्वासन दिल्याने व प्रत्यक्ष काम चालू झाल्याने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी चे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.