loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा काँग्रेस च्या वतिने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

आज मुंबई येथे काँग्रेस भवन मध्ये अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाच्या डिजिटल कार्यकर्ता नोंदणी अभियान कार्यक्रमात काँग्रेस आय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांचा सत्कार करमाळा काँग्रेस आय कमिटीचे ता.अध्यक्ष श्री.प्रतापराव जगताप यांनी केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी सोलापुर जिल्हा काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते पाटील ऊपस्थित होते.यावेळी नानाभाऊ पटोले यांनी श्री.प्रतापराव जगताप यांना पुढील राजकीय प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या तसेच काँग्रेस पक्षवाढीसाठी कांही कानमंत्रही दिले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी श्री.जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना बोलताना आभिवचन दिले कि येणाऱ्या काळात निश्चितपणे करमाळा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आपण कटीबद्ध राहुन N.S.U.I. विद्यार्थी काँग्रेस, महिला काँग्रेस , अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेलच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां मार्फत संपुर्ण करमाळा तालुक्यात डिजीटल सभासद नोंदणी अभियान राबवुन काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्नशिल रहाणार असल्याचे सांगितले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या कार्यक्रमात सोलापुरच्या आमदार प्रणितीताई शिंदे,लातुरचे आमदार धिरज देशमुख,यांनीही प्रतापराव जगताप यांच्या नुतन निवडीचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts