loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा तालुक्यातील संभाव्य जि. प गटात व पं स गणात पाटील गट ताकदीने उतरणारच आहे पण माढा तालुक्यातील 36 गावे समाविष्ट असलेल्या दोन जि प गट व चार पं स गणातही उमेदवार उभे करणार - सुनिल तळेकर

संभाव्य गण व गट रचना पाटील गटास पुरक अशीच आहे पाटिल गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांचा दावा आगामी निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जि. प. तसेच पं. स निवडणुकीत पाटील गट विजयी परंपरा राखणार असा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.येत्या काही दिवसात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असून करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांच्या वर झाडणे चालू असल्याने चांगलेच तापले आहे. याबाबत सविस्तर बोलताना प्रवक्ते तळेकर यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील संभाव्य गण व गट रचनेची माहिती मिळाली असता परत एकदा पुर्वी प्रमाणेच सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गण होणार आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

संभाव्य रचनेनुसार केम जि. प गटात केम व साडे हे पं. स गण असतील तर वांगी जि. प गटात वांगी व जेऊर हे पं स गण, नव्याने होणार असलेल्या चिखलठाण जि प गटात चिखलठाण व उमरड हे पं स गण आहेत. तर कोर्टी जि प गटात कोर्टी व केतूर पं स गण तसेच वीट जि प गटात वीट व हिसरे पं स गण आहेत.तसेच पांडे जि प गटात पांडे पं स गण व रावगाव पं स गण असतील.संभाव्य पंचायत समिती गणातील समाविष्ट गावे पुढील प्रमाणे राहतील.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

1) केम पं स गण : केम, कंदर, सातोली, वडशिवणे, मलवडी 2) साडे पं स गण : साडे, घोटी, पाथुर्डी, वरकुटे, आळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी 3) वांगी पं स गण : वांगी (1,2,3,4), भीवरवाडी, ढोकरी, बिटरगाव (वा), सांगवी 1,2, कविटगाव, पांगरे, भाळवणी 4) जेऊर पं स गण : जेऊर, दहिगाव, शेलगाव, लव्हे, निंभोरे, जेऊरवाडी, शेटफळ 5) चिखलठाण पं स गण : चिखलठाण 1,2 केडगाव, कुगाव, सोगाव पु, प, गोयेगाव, उंदरगाव, वाशिंबे, उंदरगाव, मांजरगाव, रिटेवाडी, 6) उमरड पं स गण : उमरड, अंजनडोह, झरे, पोफळज, कुंभेज, कोंढेज, वरकटणे, सरफडोह 7) कोर्टी पं स गण : कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, पोंधवडी, कुस्करवाडी, राजूरी, सावडी, दिवेगव्हाण, देलवडी, कुंभारगाव, घरतवाडी,भिलारवाडी,कावळवाडी 8) केतूर पं स गण : केतूर 1,2, पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, गुलमरवाडी, भगतवाडी, खातगाव 1,2, जिंती, टाकळी, रामवाडी, कात्रज, कोंढारचिंचोली 9) वीट पं स गण : वीट, मोरवड, विहाळ, पिंपळवाडी, भोसे, हिवरवाडी, रोशेवाडी, करमाळा ग्रामीण, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी 10) हिसरे पं स गण : हिसरे, फिसरे, सौंदे, शेलगाव क, अर्जुननगर, करंजे, भालेवाडी, दिलमेश्वर, वाघाचीवाडी, मिरगव्हाण, हिवरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे 11) पांडे पं स गण : पांडे, देवीचामाळ, धायखिंडी, खांबेवाडी, पोथरे, निलज, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव, पाडळी, घारगाव 12) रावगाव पं स गण : रावगाव, वंजारवाडी, वडगाव द, ऊ, मांगी, कामोणे, बिटरगाव, आळजापुर, खडकी, जातेगाव, पुनवर व लिंबेवाडी असे एकुण 12 पंचायत समिती गण आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मागील विधानसभेत माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार शिंदे व बागल यांचेवर करमाळा तालूक्यातून जवळपास 20 हजार मतांची आघाडी घेतली होती. तसेच करमाळा पंचायत समिती वर सुध्दा एकहाती सत्ता स्थापन केली होती. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आगामी निवडणुकीत सुध्दा विजयी परंपरा कायम राहील. करमाळा तालुक्यातील जि. प गटात व पं स गणात पाटील गट ताकदीने उतरणारच आहे पण माढा तालुक्यातील 36 गावे समाविष्ट असलेल्या दोन जि प गट व चार पं स गणातही उमेदवार उभे करणार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts