आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील गटाकडून एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप बंद होण्याचे नाव घेत नाही .आमदार संजय मामा शिंदे हे मि मंजूर केलेल्या विकासकामांवर नारळ फोडून श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत असल्याची टिका माजी आमदार नारायण पाटील यांनी केली होती आमदार समर्थक माजी जिल्हापरिषद सदस्य वामनदादा बदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर टिका करुन उत्तर दिले होते . त्यानंतर बदे यांच्यावर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी खरमरीत व मार्मिक भाष्य करुन उत्तर दिले .त्यानंतर बदे यांचे चिरंजीव प्रमोद बदे यांनी सुनील तळेकर यांच्यावर खालच्या भाषेत टिका करुन आक्रमक पवित्रा घेतला . आज पुन्हा पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार शिंदे गटावर टीकास्त्र सोडले असुन, आमचे देवी,सावंत, जगताप यांच्यासोबत भांडण नव्हते मात्र मुळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत विजयाची पायरी ओलांडून देणार नसल्याचे सांगताना मुळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांस आडवण्यासाठी वेगळी समीकरण आखले असल्याचा इशारा दिला आहे. तसेच शिंदे हे जिल्याचे नेते नाहीतच असे अधोरेखित करताना "स्व नामदेवराव जगताप हे खरे जिल्याचे नेते होते व आजमितीस व विजयसिंह मोहिते-पाटील हेच खरे जिल्ह्याचे नेते" असल्याची टिका केली होती. यास आमदार संजयमामा शिंदे गटाकडून सोशल मिडीयावर मजकूर व्हायरल करुन तळेकर यांना सवाल विचारले आहेत .तसेच माजी आमदार पाटील यांचे नाव न घेता आमदारकीतुन व वाळुचोरीतुन पैसै कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून आता या राजकीय आरोप प्रत्यारोपास वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
आमदार शिंदे गटाकडून सोशल मिडीयावर मजकूर पसरवला जात असून त्या मध्ये तुमचे भांडण जगताप- देवी- सावंत यांचेशी नव्हते मग जगताप यांचे बरोबर राहुन मार्केट कमिटी ला बंडगरांना निवडुन आणुन जगतापांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ? तुम्हीच ना?कन्हैय्यालाल देवी यांचे विरुद्ध नगरपरिषदेला महेश चिवटे चा पत्ता आणला कोणी.?. देवींची पाठ का हो सोडली.? सावंत यांची ताकद कमी करण्यासाठी अंधारातुन काय काय चाली खेळल्या तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी.. सन२०१४ ला आमदार म्हणुन निवडुन येऊनही विलासराव पाटील, चंद्रकांत सरडे, दत्ता जाधव यांचेसारखे असंख्य कार्यकर्ते का हो राहीले नाहीत आपल्या जवळ?.असे सवाल उपस्थित केले आहेत.
तसेच शंभर शंभर पदे असणारी माणसे तुमच्या जवळ असुनही करमाळ्यात आमदार संजयमामांच्या मतदानात २०१४ नंतर वाढ झाली.. आणि वाढ होतच आहे.. होतच राहील... अहो आजही तुमचे गटातुन प्रशांत पाटील ( झरे)... अॅड. अजितराव विघ्ने( केत्तुर) आणि बरीचशी माणसे आमचे कडे येत आहेत, त्यामुळे प्रवक्ते तुम्ही शिंदे ची माणसे विजयाची पायरी चढणार नाहीत असे सांगुच नका... कालची पंचायत समिती मिळाली तेव्हा जयवंतराव जगताप तुमच्या सोबत होते , तुमच्या आमदारकी होती.... आता सगळीच कवच कुंडल गळुन पडल्यावर तुमच्याकडची माणसं तुमच्याकड राहत्यात का ते बघा.असा देखील इशारा देण्यात आला आहे.शिंदेची तर माणसे निवडुन येतीलच पण जगताप- सावंत- देवी सुद्धा विजय रथात असतील असा आत्मविश्वास या पोस्ट द्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.