करमाळा तालुक्यातील सत्तेत केवळ दोनच पदाधिकारी पदावर असताना आमदार संजय शिंदे गटास सत्तेचा एवढा माज का असावा असा सवाल करत आगामी निवडणुकांमध्येही मुळ आ. शिंदे गटाचा एकही कार्यकर्ता तालूका पातळीवर जनता निवडून येऊ देणार नाही व जनताच आमदार शिंदे गटाचा माज उतरवेल असा हल्लाबोल आज माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केला आहे .
काल आ. शिंदे गटाकडून प्रवक्ते तळेकर यांना अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून यावे अशी टिका केली होती. त्यास आज तळेकर यांनी उत्तर देताना परत एकदा थेट मुळ आ. शिंदे गटाचे वाभाडे काढले.याबाबत सविस्तर बोलताना सूनील तळेकर म्हणाले की आमदार शिंदे गटास आज करमाळा तालुक्यातील राजकारणात जवळपास सात वर्षे झाली. परंतू स्वतः आमदार संजयमामा शिंदे व बाजार समितीचे विद्यमान सदस्य चंद्रकांत सरडे हे दोघेच पदावर कार्यरत आहेत. करमाळा तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री आदिनाथ व श्री मकाई सहकारी साखर कारखाना, जिल्हा दुध संघ, सोलापुर जिल्हा सहकारी बँक, करमाळा नगरपालिका आदि महत्त्वाची सत्तास्थाने विचारात घेता एकुण 100 च्या आसपास पदाधिकारी असतील. यातील आमदार म्हणून संजयमामा शिंदे व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून युवानेते चंद्रकांत सरडे हे दोघेच सत्तेत सहभागी आहेत. उर्वरीत बहुतांश पदाधिकारी हे माजी आमदार नारायण पाटील गट, स्व.दिगंबर बागल गट जगताप गट, सावंत गट तसेच देवी गट व मोहिते-पाटील गट यातील दिसुन येतात.
आज मुळ आ.शिंदे गटात लोकांनी नाकारलेल्या माजी पदाधिकाऱ्यांचा भरणा असून यांची राजकीय दुकानदारी पाठीमागील काळातच बंद झाल्याने अनेकांनी आ. शिंदे गटात प्रवेश केला.आजमितीस आ. शिंदे गट जर आमदार या पदावर असेल तर तो माढा तालुक्यातील 36 गावे व मा. आमदार जयवंतराव जगताप गट, स्व. सुभाष (अण्णा) सावंत गट, स्व. गिरीधरदास देवी गट यांनी दिलेल्या भक्कम पाठींब्यामुळेच आहे. मुळ शिंदे गटाचे नाममात्र दोनघ पदाधिकारी आहेत.यातही चंद्रकांत सरडे हे स्वतः च्या लोकप्रियतेमुळे व राजकीय कौशल्यामुळे जवळपास स्वबळावर निवडून आले आहेत. यामुळे आता शिंदे गटाने माझ्या पदाची काळजी करण्यापेक्षा आगामी निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करावे. माझ्या कुटूंबास जेऊर पंचायत समिती गणातून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकदा संधी देण्यात आली व विक्रमी मतांनी विजयी झालो होतो. आता 2024 ला परत एकदा नारायण (आबा) पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणणे हेच हजारों कार्यकर्त्यां प्रमाणे माझेही ध्येय आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.