loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटील गटाच्या प्रवक्त्याने किमान ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी - सरपंच प्रमोद बदे यांचे आव्हान

राजकारणामध्ये सभ्यता या नावाचा एक गुण असतो. त्याचे आम्ही पुरेपूर पालन करत आहोत परंतु सभ्यता सोडून आणि ज्येष्ठांचा अनादर करून जर कोणी शिळ्या कढीला उत आणत असेल तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिले जाईल. नेत्याने शिकवलेली सहनशीलता आमच्या भाषेमध्ये आहे, त्यामुळेच विनाकारण अकलेचे तारे तोडून ऐतिहासिक संदर्भ देऊन आणि शब्दांचा खेळ करून सूर्याजी पिसाळ वगैरे उपमा न वापरता आणि वामन दादा यांना विधानसभा निवडणूक लढवावी असे आवाहन न देता पाटील गटाच्या स्वयंघोषित प्रवक्त्याने किमान ग्रामपंचायतीचे सदस्य व्हावे आणि त्यानंतरच वामन दादा बदे यांच्यावरती टीका करावी असे आवाहन सरपंच प्रमोद बदे यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वामनदादा बदे हे राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. गेल्या 25 -30 वर्षापासून उमरड ग्रामपंचायतीमध्ये त्यांची सत्ता आहे. असे असतानाही ज्यांना गल्लीत कोण ओळखत नाही आशा सुनिल तळेकर यांनी आपण अमुक गटाचा प्रवक्ता म्हणून वामनदादा बदे यांच्यावरती टीका करणे शोभत नाही. त्यांना टीका करायचीच असेल तर आपली पात्रता अगोदर सिद्ध करावी. किमान ग्रामपंचायतीचे सदस्य व्हावे आणि नंतरच लोकनियुक्त सदस्यांबद्दल , प्रतिनिधी बद्दल बोलावे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आ. संजयमामा शिंदे यांच्या बद्दल सुनील तळेकर सारख्या शुल्लक व्यक्तीने टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे .संजयमामा शिंदे हे जिल्ह्याचे स्वयंघोषित नेते आहेत किंवा नाही हे जिल्हा ओळखून आहे. यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो ,जिल्हा परिषदेची निवडणूक असो किंवा काल परवा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबद्दल ची रणनीती आखणे असो, सोलापूर महापालिकेचे होणारी निवडणूक असो या प्रत्येक निवडणुकीमध्ये आ. संजयमामा शिंदे हे कोण आहेत हे संपूर्ण जिल्ह्याला समजलेले आहे .त्यामुळे संजयमामा शिंदे हे जिल्ह्याचे नेते आहेत किंवा नाही हे सिद्ध करण्याचा प्रयास सुनील तळेकर यांनी करू नये. त्यांनी आपला गट आणि त्या गटाचे प्रवक्ते म्हणून गल्लीबोळात काम चालू ठेवावे ,त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. इथून पुढे आपण ज्यांच्याबद्दल बोलतो किमान ती बोलण्याची पात्रता, लायकी, क्षमता अगोदर स्वतःमध्ये त्यांनी आणावी आणि नंतरच आपले तोंड उघडावे अशी अपेक्षाही प्रमोद बदे यांनी व्यक्त केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

बदे यांनी केलेल्या टीकेनंतर कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts